अखेर सभापती प्रणया गड्डमवार आणि उपसभापती अरविंद देशमुख पुन्हा पदावर विराजमान

अखेर सभापती प्रणया गड्डमवार आणि उपसभापती अरविंद देशमुख पुन्हा पदावर विराजमान 


उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सभापती व उपसभापतीचा सौ प्रणया गड्डमवार व श्री अरविंद देशमुख यांनी पदभार स्वीकारला. गड्डमवार व देशमुख यांच्यावर अविश्वास प्रकरण दाखल करताना काही त्रुटी आढळून येऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाला चालना दिल्यामुळे अन्यायग्रस्त पदाधिकारी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने पारित झालेला अविश्वास ठराव नामंजूर करून गड्डमवार आणि देशमुख यांनाच पदावर कायम ठेवल्याने आज नागभीड पंचायत समिती मध्ये जाऊन त्यांनी पदभार स्वीकारला.  
                    पंं.  सं.  नागभीड येथे अभद्र युतीचा पराभव होऊन परत काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन झाल्यामुळे सर्व स्तरावरील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प स कार्यालयात सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवली आणि पद्ग्रहण कार्यक्रम साजरा करण्यात आला.           या प्रसंगी महिला तालुकाध्यक्ष जोष्नाताई  वरजूकर , माजी सभापती रेखाताई जगनाडे,नगरसेवक संजयजी अमृतकर, सोनालिताई दांडेकर,आशाताई गायकवाड,धनश्री ताई कटेखाये,सुनंदाताई माटे सरीकताई धरणे, शर्मिलाताई रामटेके सरपंच, हेमांतजी लांजेवार जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना , अर्चना ताई समर्थ , मानिशाताई नाहीटे, प्रविनजी खोब्रागडे, सौरभ मुळे , प्रमोदजी चौधरी, हरिषजी मुळे, साखरकर सर विजयजी अमृतकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!