स्वँब नेचर केअर च्या सदस्यांनी म्रुत मासे गोळा करून तलाव केला स्वच्छ
*स्वँब नेचर केअर च्या सदस्यांनी म्रुत मासे गोळा करून तलाव केला स्वच्छ*
🔘सावरगांव येथील मुख्य तलावात विषबाधा होऊन शेकडो मासे म्रुत.
🔘म्रुत मासे खाऊन पक्षी मेल्याची शक्यता.
🔘वन्यजीव व पाळीव प्राणी धोक्यात.
सावरगांव येथील मुख्य तलावात आज सकाळी पक्षी निरीक्षणाकरीता गेले असता तलावाच्या काठावर दुर्गंधी पसरली होती. तेव्हा तलावात व पाण्याच्या लगत शेकडो मासे मेले असल्याचे वन्यजीव प्रेमी यश कायरकर यांना निदर्शनास आले. संपूर्ण म्रुत मासे गोळा करून खड्यात पुरन्यात आले.
सविस्तर व्रुत, गावापासून जवळच असलेल्या मुख्य तलावात आज सकाळी शेकडो मासे म्रुत अवस्थेत आढळून आले. हे मासे नेमके कश्याने मेलेत हे समझु शकले नाही. मात्र हे विषबाधा होउन हे मासे तलावात मेल्याची शक्यता आहे. कोणी तरी मासे चोरनार्यां द्वारे अश्या प्रकारे सौम्य जहर वापरून मासे मारली जातात, किंवा या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती आहे. कोनी तरी शेतकर्यांनी शेतात किटकनाशके फवारणी केल्याचे नंतर फवारणी उपकरणे तलावात धुतलेले असावे त्यामुळे हि तलावात विषबाधा होऊन मासे मेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र ह्या तलावाच्या लगतच जंगल आहे. आणि दरवर्षी हिवाळ्यात या तलावात विदेशी प्रवासी पक्षी मोठ्या प्रमाणात येत असतात. यामुळे पक्षी निरीक्षकांना या तलावाचे आकर्षक आहे. यातलाव परिसरात वन्यप्राणी,वाघ यांचे ही वावर आहे. यामुळे, अशा प्रकारचे विषाक्त पाणी पिउन किंवा विषबाधेने मेलेली मासे खाल्याने वन्यजीव, पक्षी, तसेच तलावात पाणी पिणारे गुरेढोरे यांना ही विषबाधा होउ शकतो. तरीही सिंचन विभाने, व वन विभागाने याची दखल घ्यायला पाहिजे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी किटकनाशके फवारणी केल्या नंतर. वापरलेले उपकरणे ही तलावात किंवा नदीपात्रात धुवू नये, असे स्वँब नेचर केअर संस्थेचे अध्यक्ष श्री कायरकर यांनी सांगितले, या तलाव परिसरा स्वच्छता वेळी संस्थेचे सदस्य , विकास बोरकर, हितेश मुंगमोडे, श्रेयस कायरकर, शुभम पातलेकर, शुभम हुड, चिन्मय निकुरे, तर पक्षी निरिक्षण करीता आलेले रोषन धोतरे, व वनरक्षक एस. बी.पेंदाम,वनमजूर सोमेश्वर निकुरे आदी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!