ओबीसी महासंघातर्फे " थाळी वाजवा " आंदोलन
ओबीसी महासंघातर्फे " थाळी वाजवा " आंदोलन
राजुरा : (रोशन येवले)
ओबीसी समाजाच्या संवैधानिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आज राजुरा येथे " थाळी वाजवा "आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे ,समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे,माजी आमदार ऍड. वामनराव चटप,कार्याध्यक्ष डॉ. खुशालचंद्र बोपचे,महासचिव सचिन राजूरकर, सतीश धोटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी पंचायत समिती चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पंचायत समिती ते तहसील कार्यालयपर्यंत थाळी वाजवत व घोषणा देत पायदळ मार्च काढला. यावेळी राजुरा तहसीलदार अनिल काळू यांनी निवेदन स्वीकारले. नगरसेवक राजू डोहे,बबन उरकुडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कवडु पोटे, संतोष देरकर , बादल बेले, कपिल इद्दे ,संदीप आदे, निखिल बोन्डे,पुंडलिक वाढई, प्रकाश ठावरी,छोटूलाल सोमलकर,डी.आर.गौरकार, नागेश उरकुडे,सुधाकर रासेकर, ओबीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष अडवे,मधुकर मटाले,रामरतन चापले,साईनाथ परसुटकर,किसन बावणे,राजू चिंचोलकर,भास्कर वाटेकर,संदीप कोंडेकर,केतन जुनघरे,बाबूराव पहानपटे,प्रदीप पायघन,श्रीकृष्ण वडस्कर, प्रभाकर जूनघरे,संजय गोखरे, पुरुषोत्तम गंधारे,दिलीप नीमकर,सुजीत कावळे,स्वप्नील रासेकर,राजू दादगल,स्वप्नील बाजूजवार ,अंकूश भोंगळे यांचेसह मोठ्या संख्येत ओबीसी बांधव उपस्थित होते. तत्पूर्वी राजुरा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचे निवासस्थानी जाऊन कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!