हाथरस च्या बलात्कार पिढीतेला तहसील कार्यालय मुल समोर श्रध्दांजली अर्पण , आम आम आदमी पार्टी आदमी पार्टी मुल ने केला उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी सरकारचा तिव्र निषेध

 हाथरस च्या बलात्कार  पिढीतेला तहसील कार्यालय मुल समोर श्रध्दांजली अर्पण , आम आम आदमी पार्टी आदमी पार्टी मुल ने केला उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री  योगी सरकारचा तिव्र निषेध..




मूल :(प्रतिनीधी) 

उत्तर प्रदेश मधील हाथरस मध्ये घडलेल्या मानवतेला शर्मसार करण्या-या घटनेविरोधात व पिडीत बहिनीला न्याय मिळवून देण्यासाठी त्या निर्दयी हैवानाला फाशीची शिक्षा तातडीने देण्यात यावी. बेटी बचाव बेटी पढाव या मोदी बीजेपी सरकारच्या अभियानाची पायमल्ली बीजेपी शारीकत उ.प्र.योगी अादित्यनाथ सरकार मध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याने बीजेपी योगी सरकार आपल्या देशाच्या माता –बहिणीवर होणारे अत्याचार थांबविण्यात पूर्णपणे अपयशी झाले आहे त्यामुळे  गृहमंत्री अमित शहा, व मुख्यमंत्री अजय बिस्ट योगी आदित्यनाथ यांचा त्वरीत राजीनामा घेण्यात यावा. हाथरस मधील दोषींना फास्ट स्ट्रॅक कोर्ट मध्ये तातडीने न्यायालयीन कार्यवाही पूर्ण करून फाशिची शिक्षा देण्याची व सीबीआय तपास सुप्रिम कोर्टाचे विद्यमान न्यायाधीश यांचे देखरेखीखाली करण्यात यावा व पिडीतेला त्वरीत न्याय द्यावे यासाठी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी उपस्थित पारोमिता गोस्वामी म.रा.सदस्या आम आदमी पार्टी, गौरव श्यामकुले युवा जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, अमित राऊत तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी, कुमुदिनी भोयर महिला आघाडी अध्यक्ष आम आदमी पार्टी व विद्यार्थीनी आचल भोयर, काजल सुरपाम, दामिनी भोयर, सोनी गेडाम, प्रिया चौधरी यावेळी आदी मुली उपस्थित होत्या.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!