मला आलेली अनुभूती

मला आलेली अनुभूती





चंद्रपुर 
    उन्हाळ्यात जेव्हा लाॅकडाऊन सुरू होते तेव्हा माझ्याकडची तुळशी वाळली होती. मला तुळशीच्या दर्शनाची खुपचं ओढ लागली होती.एवढ्या ऊन्हाळ्यात तुळशी कुठुन मीळणार. हे परमेश्वरा माझी हि ईच्छा तु कशी पुर्ण करणार. मी आस सोडून दिली होती. आंब्याचा सीझन होता. मी एक दिवस आंब्याची कोय एका अलवीराच्या कुंडीत पेरून ठेवली. बरोबर २१ दिवसांनी त्या कोयीला पान फुटले. पुजेला पाने होतील म्हणून मी ती कोय एका दुसऱ्या कुंडीत लावली. बरोबर आठ दिवसांनी त्या कुंडीत आंब्याच्या झाडासोबत पाच नवीन तुळशीची रोपे लागली होती ते पाहुन मला खूप आश्चर्य वाटले आणि तुळशीमातेबद्दल कृतज्ञता वाटली व माझ्या डोळ्यात पाणी आले की खरच 
आपली जर मनापासून  ईश्वरप्राप्तीची ओढ असेल तर नक्की देव आपली ईच्छा पुर्ण करतो फक्त आपली श्रद्धा ,तळमळ व भाव महत्त्वाचा.
    ||जय तुळशी माता||
           सौ.आशा गंधेवार, चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!