चिमूर तालुक्यातील मोटेगावला नेण्यात येणारी ५ लाख ९६ हजार रुपयांची अवैध देशी दारू जप्त
दारू माफीया अविनास नवरखेडे ( हिंगणघाट ) यांची अवैध दारू दारूबंदी पथक चंद्रपूर यांनी चिमुर तालूक्यात पकडली
चिमूर तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.११/१०/२०२० पोलीस एफ.आय.आर नुसार पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथे अवैध दारूची तस्करी करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती दारूबंदी पथक चंद्रपूर यांना मिळाली. पोलिसांनी कपरला टी. - पॉईंट वर नाकाबंदी लावली.११:५० वाजता पोलिसांना उमरेड कडून पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक. एम.एच.३१ डी. सी. ७२८१ येतांना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता पोलिसांना गाडीच्या डिक्कीत व मधल्या सीटवर देशी दारूचे १८० एम. एल. चे ४८० नग अंदाजे किंमत ९६ हजार ९० एम. एल. चे ३५०० नग अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार, ९० एम. एल. चे १५०० नग अंदाजे किंमत - १ लाख ५०,००० अशी एकूण ५ लाख ९६ हजार रु. ची देशी दारू आढळून आली. गाडीची किंमत ६ लाख असा एकूण ११ लाख ९६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन चालक प्रशांत शेखर डोंगरे वय २६ वर्षे रा. गौतम वार्ड हिंगणघाट याने पोलिसांनी चौकशी केली असता सांगितले की, सदर दारू मोटेगाव येथील बंडू पाटील यांना देण्याचे हिंगणघाट येथील अविनाश नवरखेडे यांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी प्रशांत डोंगरे, अविनाश नवरखेडे, बंडू पाटील मोटेगाव, निखिल प्रमोद काटकर वय २२ वर्षे शास्त्री नगर हिंगणघाट या चारही आरोपीविरुद्ध दारूबंदी पथक चंद्रपूर चे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांच्या फिर्यादीवरून भिसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!