वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात भाजपा महिला आघाडीचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात भाजपा महिला आघाडीचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

महिला सुरक्षा कायदा आणखी कडक करण्याची केली मागणी.

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र.



ब्रम्हपुरी :

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षा बाबतचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मागील काही महिन्यात राज्यात महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग व हत्याकांडाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळात ही कोविड सेंटर व दवाखान्यात महिलांवरील अत्याचार, बलात्कार व विनयभंगांचे सत्र सुरूच आहे. महाराष्ट्रात महिला असुरक्षित असतांना देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सरकार मूग गिळून बसले आहे.

इतर राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र महाराष्ट्रात वाढत असलेल्या महिला अत्याचारावर गप्प आहेत. महिलांप्रति बेगडी सन्मान असलेले काँग्रेस नेते महाराष्ट्रातील महिला अत्याचार प्रकरणांवर मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. 

राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व युवा मोर्चा ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात येथील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत, महिला सुरक्षा कायदा अधिक मजबूत करण्याची मागणी केली. या संदर्भात महिला आघाडी व युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदारांमार्फत पत्र पाठविण्यात आले.


या प्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सौ. वंदनाताई शेंडे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. रश्मी खानोरकर पेशने, नगरसेविका पुष्पा गराडे, माजी नगरसेविका डॉ.हेमलता नंदूरकर, माजी नगरसेविका अनघा दंडवते, माजी नगरसेविका यास्मिन लाखानी, पंचायत समितीच्या उपसभापती सौ. सुनीता ठवकर, पं. स सदस्या सौ.उर्मिला धोटे, सदस्या सौ.सुनंदा ढोरे, सदस्या सौ. ममता कुंभारे, पंचायत समितीचे सभापती प्रा.रामलाल दोनाडकर, प्रदेश ओबीसी आघाडी सदस्य प्रा.प्रकाश बगमारे, भाजपा शहर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, माजी उपसभापती नामदेव लांजेवार, जेष्ठ नेते अरुण शेंडे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, महामंत्री रितेश दशमवार, महामंत्री स्वप्नील अलगदेवें, सचिव दत्ता येरावार, उपाध्यक्ष पवन जैस्वाल, ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष पंकज माकोडे, साकेत भानारकर, अरविंद कुंभारे, अमित रोकडे, ओंकार हरदास, प्रेमलाल धोटे, अशोक हटवार, चुंमदेव जांभूळकर यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!