सिंदेवाही येथे मनीषा वाल्मिक मुलीसोबत झालेल्या अमानविय पाशवी हत्याकांडाचा तीव्र निषेध
मनीषा वाल्मिक जिला हातरस (उत्तरप्रदेश) या मुलिसोबत झालेल्या अमानवीय पाशवी हत्याकांडाचा तीव्र निष
राहुलजी गांधी यांच्या हल्याचा निषेध
जितेंद्र पेंदाम / शशिकांत बतकमवार
पवनपार/सिंदेवाही
मनीषा वाल्मिक जिल्हा हाथरस (उत्तरप्रदेश) येथील मुलिसोबत झालेल्या अमानवीय पाशवी हत्याकांडाचा तीव्र निषेध सिंदेवाही येथील शिवाजी चौकात कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला.
सविस्तर बातमी अशी आहे की, दिनांक 14 /09/ 2020 रोजी उत्तरप्रदेश राज्यातील हातरस या जिल्ह्यातील वाल्मिक या दलित कुटुंबातील 19 वर्षीय तरुण मुलीवर ठाकुर घरान्यातिल काही समाजकंटकानी पाशवी अत्याचार करुण अमानुषपने तिची हत्या केली मानवी हॄदयाला हेलावून टाकणाऱ्या आणि मानव समाजाला काडीमा फ़ासनारे असे हे अमानवीय कृत्य.
एकीकडे खैरलांजी हत्याकांडाच्या जख्मा अजूनही मानवी मेंदुतुंन संपलेल्या नाहीत, दिल्लीत घडलेल्या निर्भया हत्याकांडाची शाही अजूनही वाळलेली नाही, कठुआ येथील हत्याकांडाच्या जख्मा अजूनही ताज्या असताना पुन्हा भारत देशाची मांन जागतिक पातळीवर खाली घालनारी मानवी हृदय सुन्न करणारी पुन्हा एक त्याच पठडीतिल घटना आमच्या भारत देशात घडलेली आहे कोणत्या शब्दात या घटनेचा निषेध करावा असे शब्द ही आता शब्दकोशात नाही.. की भारत देश चालवीणाऱ्या सत्ताधिशाला आणि उत्तरप्रदेश राज्याची सत्ता सांभाळणाऱ्या सत्ताप्रमुखाला औलाद नाही म्हणून की त्याना संततीप्रेम काय असतो यांच्या संवेदनाचा अनुभव कीवा जाणीव नाही म्हणूनच की काय इतके दिवस उलटूनसुद्धा मन की बात वाले बे-मन साहेब तसेच त्यांचे शिष्य योगीबाबा चुप्प आहेत..?*
*कोणी एकाही नामवंताने साधी सांत्वना किवा दुःख सुद्धा व्यक्त केले नाही, या आनवीय कृत्याविरुद्ध आणि दलित कुटुम्बियातील मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि नंतर हत्याकांड त्यामुळे कुटुंबाची झालेली वताहत, आणि कुटुंबाला सोसाव्या लागत असलेल्या वेदना, अति तीव्र वेदना यामुळे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी आणि उत्तरप्रदेश राज्याच्या प्रभारी प्रियंका गांधी यांचेसह त्यांचे सहकारी हे वाल्मिक कुटुंबाला सांत्वनापर भेट देण्याकरिता जात असताना त्याना यमुना हायवे महामार्गावर उत्तरप्रदेश पोलिस आणि काही विशिष्ट समाज कंटकानी रोखण्याचा प्रयत्न केला या मध्ये राहुलजी गांधी याना धक्का-बुक्की करुण प्रियंका गांधी यांचे सह शेकडो कार्यकर्त्यवर अमानुषपने लाठीचार्ज करण्यात आले यामध्ये राहुलजी गांधी यांचे सह कार्यकर्ते सुद्धा जख्मी झालेत.
या दोन्ही दुःखद अमानवीय घटनेच्या निषेधार्थ सिंदेवाहि येथील प्रमुख शिवाजी चौकात "जाहिर निषेध" सभा सौ सीमाताई सहारे अध्यक्ष महिला तालुका महिला कांग्रेस आघाडी यांच्या मार्गदर्शनाथ श्री अरुनभाऊ कोलते ज्येष्ठ कांग्रेस कार्यकर्ते, विरुभाऊ जैस्वाल माजी उप-सभापति, सुनिलभाऊ उट्टलवार शहर अध्यक्ष शहर कांग्रेस कमेटी यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध नोंदवून जाहिर निषेध सभा घेण्यात आली. सदर सभेला युनुसभाई शेख सामाजिक कार्यकर्ता तथा नगरसेवक यानी संबोधित केले मुख्यत्वे सदर जाहिर सभेला प्रामुख्याने सौ, अशाताई गंडाते अध्यक्ष न.प. सिंदेवाहि नरेन्द्रजी भैसारे गटनेता न.प. सिंदेवाहि, भुपेशजी लाखे, योगेशभाऊ कोकुलवार, नंदाताई बोरकर, प्रणालिताई जीवने, युनुसभाई शेख सर्व नगरसेवक, मयूरभाई सूचक तालुका अध्यक्ष यू.कांग्रेस, लताताई गेडाम, सचिनजी नाडमवार माजी सरपंच, अनिलभाऊ उट्टलवार, प्रविनभाऊ मोगरे, सुहास मंडलवार, भास्कर नन्नावार, महेश मंडलवार, योगेशजी रगड़े, संगत साहेब पलसगाव इत्यादि ज्येष्ठ, कनिष्ठ मान्यवर तथा महिला भगिनी शेकडोच्या संख्येने उपास्थि होते.
योगिराज जंगलराज, योगी सरकार मुर्दाबाद, केंद्रसरकार शर्म करो, तानाशाही नहीं चलेगी, न्याय दो-न्याय दो- पीड़ित मनीषा को न्याय दो. इत्यादि घोषणा देत जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!