राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम एल्गार अभ्यासिकेच्या ज्ञानमय वातावरणात मोठ्या उत्साहात
मूल :( अभी भिमणवार)
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम एल्गार अभ्यासिकेच्या ज्ञानमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी नगरसेविका सौ. मंगला ताई बोरकुटे उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार मा. अमित राऊत उपस्थित होते. पाहुण्यांनी एल्गार अभ्यासिकेच्या न्यूनत्तम फी मध्ये उत्कृष्ट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच "गांधीच्या जीवनावर आधारित चर्चा सत्राचे" आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून एल्गार अभ्यासिकेचे संचालक मा.श्री. ऍड. डॉ. कल्याण कुमार सर उपस्थित होते. यावेळी भाषण स्पर्धेच्या बक्षिसांचे पण वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम क्रमांक प्रिया चौधरी या विद्यार्थिनीने पटकावले. कार्यक्रमाचे संचालन दिनेश देशमुख सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. प्रिया चौधरी या एल्गार अभ्यासिकेच्या विद्यार्थिनीने केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!