यशश्री ' वर्षिकांकाला गोंडवाना विद्यापीठाचा पुरस्कार
राजूरा :( रोशन येवले)
महाविद्यालयाचा वार्षिकांक म्हणजे महाविद्यालयाचे प्रतिबिंब! सत्र २०१९-२० करिता ' पर्यावरण, आरोग्य व स्वच्छतेकरिता युवाशक्ती ' विशेषांक गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे वार्षिकांक स्पर्धेकरिता पाठविण्यात आला होता. विद्यापीठाकडून वार्षिकांकाला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला.
या वार्षिकांकात ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या लेख , कविता या माध्यमातून जे विचार अभिव्यक्त केले ते अभ्यसनीय आहेत. ' यशश्री ' च्या अनुषंगाने लिहिलेले साहित्य पुढील विद्यार्थ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. ' यशश्री ' वार्षिकांकाला दरवर्षी कोणता ना कोणता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यांचे सर्व श्रेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जाते.
द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, संपादक प्रा. डॉ. संतोष देठे, सहसंपादक प्रा. संजय शेंडे, तसेच संपादक मंडळातील सर्व सदस्य, विद्यार्थी संपादक मंडळातील प्रमुख विशाल शेंडे व अन्य सदस्यगण, ज्यांनी या वार्षिकांकासाठी लेखन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्री. कुंदोजवार साहेब, सचिव मा.श्री. अविनाश जाधव, संस्थचे पदाधिकारी व सदस्यगण यांनी सर्वाचे अभिनंदन केले.
याशिवाय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!