ब्रम्हपुरी येथे ओबीसींनी विविध मागण्यांसाठी केले घंटानाद आंदोलन
ब्रम्हपुरी येथे ओबीसींनी विविध मागण्यांसाठी केले घंटानाद आंदोलन
आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय एकवटले
ब्रम्हपुरी (विनोद चौधरी) :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ ब्रम्हपुरी च्या वतीने सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत 8 ऑक्टोबरला गाडगेबाबा स्मारक ब्रम्हपुरी येथे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या मुर्तीला माल्यार्पण करून या भव्य आंदोलनाची सुरुवात झाली घंटा वाजवत व ओबीसींच्या घोषणा देत भव्य रॅली सर्वप्रथम खासदार अशोकजी नेते यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे कार्यालयात निवेदन देण्यात आले. या ओबीसी आक्रोश रॅलीचा समारोप तहसील कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आला.
याप्रसंगी ब्रम्हपुरी नगरातून व गावागावातून आंदोलनात सहभागी झालेल्या जेष्ठ मंडळी व युवा मंडळींनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे व आरक्षण 52℅मिळालेच पाहिजे यासाठी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. तसेच यावेळी सर्वच पक्षांतील ओबीसी नेत्यांनी यापुढे शुद्धा पक्षनिष्ठा प्रसंगी बाजूला सारून ओबीसींच्या मुद्द्यावर आपण सदैव एकत्र येऊ एकोप्याने रस्त्यावर उतरून शासनाशी भांडूच असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला. तसेच लवकरच पुनःश्च राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिर्षत्व नेतृत्वाच्या सूचनेनुसार मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.व कोणत्याही परिस्थितीत ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यास शासनास भाग पाडूच हा निर्धार विशेषत्वाने व्यक्त करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!