नागरीकांनी स्वताहून तपासनी करण्याचे-प्रकाश संपकाळ उपविभागीय अधिकारी यांचे आवाहन

नागरीकांनी स्वताहून तपासनी करण्याचे-उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यांचे आवाहन


पवनपार व पवना येथे झाला होता विरोध 
उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यांनी केली मध्यस्थी

राहुल पोरेड्डीवार पंचायत समिती सदस्य यांच्या  उपस्थितीत  घेतली ग्रामपंचायतचे पदाधिकारी बैठक



जितेंद्र पेंदाम
पवनपार

माझे कुटूंब माझी जबाबदारी अंतर्गत गावा गावातील प्रत्येक कुटूंबातील सदस्यांची  ऑक्सिमिटरने व थर्मल स्कैनिंग ने शरीरातील तापमान व ऑक्सिजन लेवल तपासनी केली जात आहे.
 परंतु मागील काही दिवसापासून पवनपार व पवना येथील नागरीकांनी तपासनीला विरोध केला होता. यामध्ये तपासनी दरम्यान जनजगृतीचा अभाव हा होता. अनेक गैरसमज पसरलेले होते. तपासनी केल्यास कोरोनाच दाखवतात ही भिती त्यांना होती. त्यामुळे नागरीक तपासनीला विरोध केला होता. अनेक महिला व नागरीक तपासनी करू द्यायची नाही असा अट्टाहास धरला होता. काही काही ठिकाणी तर नागरीक आरोग्य टिम सोबत हुज्जत ही घातली होती.
  त्यामुळे सिंदेवाही येथील प्रशासनाला बोलावन्यात आलं होतं. त्यांनीही ग्रामपंचायतचे पदाधिकारी सोबत मिटिंग घेतली होती. परंतु त्यांचा ही नाईलाज झाला होता.
 अखेर वरिष्ठांकडे ही बाब मांडन्यात आली.उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ साहेबांना पाचारन करण्यात आले. त्यांनी ही ग्रामपंचायतचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समितीचे सदस्य राहुल पोरेड्डीवार यांच्या सोबत मिटिंग घेतली. उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ. साहेबाना तपासनीचे महत्व पटवून दिले. काही टिप्स दिल्या. नागरीकांना समजावून सांगितले. नागरीकांनी स्वताहून तपासनिला पुढे यावे .तपासनीला विरोध करू नये असे आवाहन केले. सभेला पवनपार व पवना येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व राहुल पोरेड्डीवार पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!