भिसी येथील सागवान तस्कर कल्यानदास नवखरे यांच्या ट्रॅक्कर ने उडवला दुचाकी वाहानाला

दुचाकी वाहन चालक गंभीर जख्मी

ट्रॅक्टर वाहन चालकावर भिसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

कपर्ला येथील अवैध सागवान साठा चिमुर वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी केला खडसंगी डेपो मध्ये जमा

तालुका - प्रतीनीधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंर्तगत मौजा कपर्ला येथे दिनांक.०८/१०/२०२० ला दुपारी.१२:३० वाजता बोरगाव कपर्ला चौरस्ता येथे ट्रॅक्कर व दुचाकी वाहानाचा अपघात झाला.दुचाकी स्वार वाहन घेऊन भिसी वरुन जांभुळघाट ला जात असताना बोरगाव कपर्ला चौरस्त्यावर अचानक अवैध सागवान भरून भरधाव वेगाने ट्रॅक्कर भिसी रोडवर अाडवा आल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी वाहन ट्रॅक्टर च्या मधला चक्याला जाऊन धडकल्याने ट्रॅक्टर मागच्या टाली च्या चक्यात दुचाकी सापडली यात दुचाकी वाहन चालक हा बाजुला फेकल्या गेला व वाहन चालक ट्रॅक्टर  मागे घेऊन दोन चाकी वाहान बाहेर काढला व ट्रॅक्टर घेऊन निघून गेला.कपर्ला गावात जो अवैध सागवान साठा जमा होता तीथे ट्रॅक्टर खाली करण्यात अाला व ट्रॅक्टर बाजुला नेऊन लपवण्यात आला.दोन चाकी वाहन चालक  मोहनसिंग जुनी हा जांभुळघाट ता.चिमुर चा रहवासी अाहे.वाहन क्र. एम एच ३५ ये के १४३४ गंभीर जख्मी असुन त्यांचा प्रथम उपचार जांभुळघाट येथे करण्यात आले.नंतर डोक्याला व पाय फ्याक्चर असल्याने ब्रम्हपुरी ला रेफर करण्यात अाले.कोणतीही जीवहानी झाली नाही. ट्रॅक्टर क्र.एम एच ४०,ये एम ०८४० भिसी येथील सागवान तस्कर कल्यानदास नवखरे (सातपुते जावई) यांचा अाहे.ट्रॅक्टर चालक भास्कर सोनवाने हा कपर्ला येथील रहवासी अाहे.त्याच्या वर कलम २७९,३३६,३३७,४२७ व १८४ अंर्तगत गुन्हा भिसी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे.कपर्ला येथे लाखो रूपयाचा अवैध सागवान साठा कल्यानदास नवखरे यांनी साठवून ठेवला होता.यावर चिमुर वनपरीक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे मौका चौकसी करून अवैध सागवान खडसंगी डेपो येथे जमा करण्यात अाला.सागवान तस्कराने काही लोकाना दारू पाजुन अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.
  मागील चार-पाच वर्षा पासुन कल्यानदास नवखरे हा अवैध सागवान तस्करी करीत होता.बऱ्याच वेळा यांच्यावर कार्यवाही झाल्या अाहेत व वनपाल दोडके यांच्या आर्शिवादाने काही कार्यवाही करण्यात आल्या नव्हत्या.चिरी-मिरी मुळे सागवान तस्करी चे काम जोरात चालू होते. मांगील कोरोना च्या काळात लाखो रूपयाचे सांगवान भिसी परीसरात पकडण्यात आले होते ते सांगवान या तस्कराचे तर नाही ना? कारण अजुन पर्यंत कोणावरही कार्यवाही करण्यात अाली नाही.या तस्कराची कसुन चौकशी केली तर वनविभागाला मोठा मासा मिळू शकतो.या परीसरात बऱ्याच दिवसा पासुन अवैध सागवान कटाई जोरात सुरु अाहे.म्हणून सखोल चौकशी होने गरजेचे आहे.याच तस्कराच्या ट्रॅक्टर ने मागच्या वर्षी हमाल ट्रॅक्टर अपघातात मरण पावला होता.सामोरची ची चौकशी चिमुर वनपरीक्षेत अधिकारी भाविक चिवंडे व भिसी पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक मनोज गभणे हे करीत अाहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!