वारंवार बदली स्थगीत करणाऱ्या कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोडला भारमुक्त केव्हा करणार?
८ वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यकाळ
बदली स्थगीत करण्याची कारणे काय?
चंद्रपूर जिल्ह्यात बेशिस्तीपणामुळे भ्रष्ट्राचाराला मिळते चालना
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमूर : - कनिष्ठ लिपिक आर.के.राठोड हे दिनांक. ०१ फेब्रुवारी २०१२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तहसील कार्यालयात रुजू झाले.तब्बल ८ वर्षांनंतर त्यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तहसील कार्यालयात २०१९ ला झाली.दिनांक ३१/०५/२०१९ ला रविंद्र राठोड याला भारमुक्त करण्याचे निर्देश पत्र चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे आहे.परंतू तात्कालिन तहसीलदार संजय नागटिळक यांनी,कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोडला सोयीस्करपणे भारमुक्त न करता अभय देण्याचे वारंवार काम केले.या कनिष्ठ लिपिकाला चिमूर तहसील मध्ये कार्यरत ठेवण्याचे सबळ कारण नसताना का म्हणून ठेवण्यात आले?हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा आहे.यामुळे आतातरी भ्रष्ट्राचाराला वाव देणाऱ्या या कनिष्ठ लिपिकाला प्रभारी तहसीलदार टि.एम.कोवे भारमुक्त करतील काय?हा प्रश्न सुध्दा चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला आव्हानात्मक आहे.चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी दिनांक.३१ में २०१९ दिनांक.२९ जुन २०१९ दिनांक.१६ आॅगष्ट २०१९ दिनांक .२१ जुलै २०२० ला चारदा कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोड ला भारमुक्त करण्याचे निर्देशान्वये पत्र दिले.परंतू या रविंद्र राठोड ला तात्कालिन तहसीलदार संजय नागटिळक यांनी सोयीस्करपणे भारमुक्त करुन बदलीच्या ठिकाणी वरोरा येथे रुजू होवू दिले नाही. सोयीस्करपणे यासाठी कि,या कनिष्ठ लिपिकाकाडे अतिशय महत्त्वाचा म्हणजेच गौण खनिज खात्याचा भार आहे.या गौण खनिज भारातंर्गत काम करणे म्हणजे सर्व सोयीचे व सर्वांच्या हिताचे काम करणारा व्यक्ती तात्कालिन तहसीलदार संजय नागटिळक यांना हवा होता.म्हणूनच तहसीलदार संजय नागटिळक यांनी कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोड यांचे वारंवार प्रभावहीन कारणे मान्य करुन,तसा अहवाल चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला व रविंद्र राठोड ला भारमुक्त केले नाही.याच कारणांची पुनरावृत्ती आताचे प्रभारी तहसीलदार टि.एम.कोवे यांनी करु नये,असे सुचक बोल चिमूर तालुक्यातील नागरिकांचे आहेत.
कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोड हा गौण खनिज अंतर्गत अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष करून भ्रष्ट्राचाराला वाव देणाराच व्यक्ती असल्याचे अनेक प्रकारच्या प्रसंगानुरूप दिसते आहे.कारण लिज देताना,संबंधीत मंडळ अधिकारी व तलाठी यांचा,जागा सिमांकन अहवाल मागीतला जात नाही.याचबरोबर मुरुम-मातीची लिज देताना सबंधीत शेतकऱ्यांचे संमतीपत्र जोडले जात नाही.तद्वतच लिज किती ब्राशची आहे,या सबंधातले पत्र मंडळ अधिकारी व तलाठी यांना उत्खनन वेळेपुर्वी दिल्या जात नसल्याची ओरड मंडळ अधिकारी व तलाठी यांची आहे.लिज देवून मोकळे होण्याची कार्यपद्धत चिमूर तहसील अंतर्गत सुरु आहे.मात्र मुरुम-माती गौण खनिज उत्खननाकडे लक्ष ठेवणारी व नियंत्रण ठेवणारी कुठल्याही प्रकारची यंत्रणा चिमूर तालुकातंर्गत कार्यान्वीत नसल्याचे स्पष्ट दिसते आहे.याला कारणीभूत तात्कालिन तहसीलदार संजय नागटिळक व कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोड आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात बेशिस्तीला चालना मिळत असल्यामुळे,भ्रष्ट्राचाराचे मार्ग आपोआपच खुले होतात,हे सांगायला नकोच.या रविंद्र राठोड चे गुप्त संबंध,जिल्हा खनिकर्म कार्यालयातील अधिकाऱ्यांशी असल्याचे बोलल्या जात आहे.कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोड यांनी बदली स्थगीत करण्याची दाखवलेली आजारांची व औषधोपचारांची कारणे ही महत्वहिन आहेत.असी आरोग्याची कारणे दैनंदिन जीवनात येतात आणि जातात व सर्वांनाच लागू आहेत.मात्र,कोरोना आजारा अंतर्गत,कोरोणा आजारांच्या समास्यांचे निवारण करणारी जबाबदारी कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोड यांच्या कडे नसताना,त्यांच्याकडे कोरोना अंतर्गत समस्या निवारणाची जबाबदारी आहे असे दाखवून,परत रविंद्र राठोड यांची बदली तहसीलदार संजय नागटिळक यांनी स्थगीत केली.तहसीलदार संजय नागटिळक यांची गौण खनिज उत्खनना सबंधातील कार्यपद्धत नेहमी संदेहास्पद राहीली आहे,हे विसरणारे नाही.तहसीलदार संजय नागटिळक व कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोड यांच्या गौण खनिज उत्खनना बाबतच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी होणे प्रशासकीय हिताचेच ठरणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!