पोलीस स्टेशन मुल येथे जप्त वाहनांच्या लिलाव

पोलीस स्टेशन मुल येथे जप्त वाहनांच्या लिलाव


मूल :(सचिन वाकडे) 

सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिद घेवून चोविस तास कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग सदैव ऑन डयुटी तप्तर असते. कर्तव्य बजावत असतांना पोलीस विभागाकडून विविध गुन्हयातील आरोपींना वाहनांसह अटक केल्या जाते.  तसेच विविध छापेसत्रात वाहन जप्ती केल्या जाते. अश्या जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या लिलाव बुधवार 7 ऑक्टोंबरला सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशन मुल येथे करण्यात येत असल्याची पोलीस निरिक्षक सतिशसिंह राजपुत यांनी प्रसिध्दपत्रकातून दिली आहे.

मुल येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात निकाल लागल्याने न्यायालयाच्या आदेशान्वये लिलाव करण्यात येत असून लिलावात टाटा सुमो, पॅशन प्रो, होंडा सिडी 100, सुपर स्प्लेंडर, बजाज कावासाकी या वाहनांच्या लिलाव होत असून इच्छुकांनी लिलावाचे वेळी पोलीस स्टेशन मुल येथे हजर राहण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक सतिशसिंह राजपुत यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!