महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना आर्थिक मदत द्या ! आम आदमी पक्षाची मागणी
तालुका संयोजक राजुरा - रोशन येवले
आज दिनांक २१ आॅक्टोबर २०२० ला आम आदमी पक्ष राजुरा च्या वतीने तहसिलदार राजुरा यांना निवेदन देण्याचे ठरले होते.परंतु नुकतेच रूजू झालेले तहसिलदार हे कोरोना पाॅजीटीव्ह निघाल्याने आयसोलेशन मध्ये असल्याचे कळल्याने नायब तहसीलदार श्री अनिल काळू यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
विदर्भ,मराठवाडा,कोकण व पश्चिम महाराष्ट्राला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले असून कापूस, सोयाबीन,धान,ऊस इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.शेतक-यांचे हाती आलेले पीक पाऊसाने धुवून नेलेले आहे.वर्षभराचे पीक नाहीसे झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.त्याच्या हातचे पीक ऐन दसरा,दिवाळीत हातून गेल्याने तो पुरता कोलमडून पडलेला आहे.शेतक-यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी अजून पावेतो राज्य सरकारने शेतीचे पंचनामे केलेले नाहीत. करीता पंचनामे त्वरीत करून दिवाळी पुर्वी आर्थिक मदत देण्यात यावी.प्रमुख मागण्या येणेप्रमाणे आहेत-
१)राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा.
२)नुकसान झालेल्या पिकांसाठी प्रती हेक्टर दिल्ली सरकार प्रमाणे रूपये पंन्नास हजार मदत जाहीर करण्यात यावी.
३)कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत.
४) सोयाबीन,धान व कपाशी खरेदी हेतू सरकारी यंत्रणा उभी करावी(MSP)नुसार सरकारी खरेदी चालू करावी.
५)पुर्व विदर्भात मानव निर्मित पुरामुळे झालेली नुकसान भरपाई कोकणात दिलेल्या मदती प्रमाणे देण्यात यावी.
६)राज्यात जेथे जेथे फळबागांचे नुकसान झाले आहे तेथे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
शेतक-यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना दिलासा मिळवून घ्यावा अशी मागणी आप'चे तालुका संयोजक रोशन येवले यांनी केलेली आहे.
निवेदन देतांना तालुका संयोजक रोशन येवले, सहसंयोजक स्वप्निल कोहपरे, सुरेश लोखंडे,पवन ताकसांडे, सचिव सुभाष बोरकुटे, कोषाध्यक्ष श्रीकांत नकलवार ,युवा आघाडीचे संयोजक विजय कामेपल्लीवार आणि जेष्ठ सदस्य मिलिंद गड्डमवार यांची उपस्थिती होती.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!