गोठ्यात घुसून बिबट्याने मारल्या शेळ्या


गोठ्यात घुसून बिबट्याच्या हमल्यात 3 शेळ्या मृत.

तळोधी (बा.)  (प्रतिनिधी)
यश कायरकर

 तळोधी वन परक्षेत्र अंतर्गत सावर्ला गावातील श्री नामदेव गोविंदा गोपाले यांच्या शेळीच्या गोठ्यात घूसून काल रात्री एक वाजताच्या दरम्यान बिबट्याने हमला केला. यात 3 शेळ्या मारल्या गेल्या. विशेष म्हणजे गोपाले यांचा गोठा जंगला शेजारीच असल्याने वन्य प्राण्यांचे जवळच वावर असतो. रात्री 1 वाजता गोठ्यातून शेळ्या ओरडल्या चा आवाज ऐकुन गोठ्याकडे गेले असता बिबट्या पळून गेला. यात नामदेव गोपले यांचे या बिबट्याचे हमल्यात अंदाजे 30,000/- (तीस हजार रुपये) चे नुकसान झालेले आहे.

आज सकाळी तलोधी वन क्षेत्रसहायक के. डी. गरमडे, वनरक्षक स. बी. पेंदाम यांनी मोक्का पंचनामा केला.
वन्यप्राण्यांचा वावर असल्याने लोकांनी सावधानी बाळगायची वनविभागाने सूचना दिली. तर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी लोकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!