मूलचे ठाणेदारांचे अभिनंदन आणि अपेक्षा।


मूलचे ठाणेदारांचे अभिनंदन आणि अपेक्षा।


मागील पंधरवाड्यात मूल पोलिस स्टेशनच्या कार्यपध्दतीचा एक अनोखा अनुभव अनुभवायला मिळाला.  यापूर्वी पोलिस स्टेशनचे अनेक किस्से ऐकायची संधी मिळाली, यावेळी सुखद अनुभव मिळाला.  मूल पोलिस स्टेशनचे ठाणेदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या पध्दतीची कार्यपध्दती मूलच्या गांधी चौकात दाखविली, तशीच कार्यशैली कायम राहील्यास, मूलचे नांव निश्चितच गौरवाने घेतल्या जाईल.

त्याचे झाले असे कि, सध्या सर्वत्र कोरोणाची  महामारी सुरू आहे.  या महामारीतून सामान्य जनतेसह, शासन प्रशासन सर्वच त्रस्त आहेत,  ही महामारी दूर करण्यासाठी आणि कोरोणाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे.  याचाच एक भाग म्हणून लोकांनी बाहेर निघतांना मास्क लावावे अशी सक्ती केली जात आहे.  या सक्तीबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मूलचे  ठाणेदारांनी काही दिवसापूर्वी, मूलच्या गांधी चौकात तब्बल पंधरा पोलिसांचे  ताफ्यांसह, गांधी चौकात मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, २०० रूपये दंड ठोठावण्याची मोहीम चालविली. (फक्त मास्क न वापरणाऱ्यासाठी  एवढा लवाजमा कदाचित पहिल्यादांच लावला असेल), ही मोहीम निश्चिच अभिनंदनीय आहे.
साधे मास्क न लावणाऱ्यांना पकडण्यासाठी जर ठाणेदार साहेब आपल्या पंधरापेक्षा अधिक सहकाऱ्यांना घेवून, गांधी चौकाची नाकाबंदी करतात, तर अशीच कारवाई ते अवैद्य दारू विक्रेत्यांच्या विरोधात का करीत नाही? असा साधासुधा प्रश्न सामान्य मूल वासीय नागरीक करीत आहेत.  लॉकडाऊनच्या काळात, सर्वत्र नाकेबंदी असतांना, अवैद्य दारू विक्रेत्यांच्या ‘ट्रक’ कोणाचे ‘ई-पास’ घेवून शहरात दाखल होत आहेत?  अवैद्या दारू विक्रेत्यांच्या मुसक्या (मास्क सारख्या) आवळण्यासाठी नाकेबंदी का होत नाही? या प्रश्नाचे उत्तर निश्चितच मुल पोलिस देणार नाही, तशी अपेक्षाही त्यांचेकडून करता येणार नाही. त्यांनी दारू तस्कारांचे विरोधात तसा प्रयत्न केला तर, अनेक पोलिसांची अर्थव्यवस्थाच धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यामुळेच तसे होणे  नसले तरी, लोकांची मात्र अपेक्षा असतेच, त्याचे काय?
मूल शहरात अवैद्य दारू मोठया प्रमाणावर येत आहे… दारूच्या पव्याच्या कमी झालेल्या किमंतीने पुरवठा अधिक होत आहे, हे  स्पष्ट आहे.  ही दारू येत आहे, त्यापेक्षा ऐवढे कर्तबगार ठाणेदार आणि पोलिस यंत्रणा असतांना कशी येत आहे? हा प्रश्न आहे.  दोन दिवसापूर्वी पोलिसांचे समोरून, दुचाकी वाहनावरून मध्ये रॉकेटचे बॉक्स घेवून, पोलिसांना सलाम करीत निघून गेले.  मास्क न लावणाऱ्यांवर २०० रूपये दंडाची कारवाई करणारे पोलिस मात्र, त्या अवैद्य दारू विक्रेत्यांसमोर नांगी का टाकतात?
शहरात लॉकडाऊनमध्ये पानठेले बंद होते, चहाच्या टपऱ्या बंद होत्या, चालू होते ते दारूचे पव्वे अन् खर्रा। ते बंद करावे अशी सामान्याची अपेक्षा होती.  अर्थातच हे काम पोलिसांचे होते, मात्र मास्कसाठीचा बंदोबस्त मूल पोलिस खर्रा अन् दारूसाठी लावत नाही.. त्यामुळेच तस्करांना रान मोकळे मिळत आहेत किंवा पोलिसंच रान मोकळे तयार करून देत आहेत? चौकीदारीचा आव आणीत आहे?
मूल मध्ये मास्कसाठीच्या नाकाबंदीत, एका कर्मचाऱ्यांना एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात जावून, मास्क न लावल्यांने मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात, असाच ‘प्रसाद’ दारू तस्करांना का मिळत नाही? मास्क न लावणाऱ्यांवरची कारवाई ही दिसते किंवा आम्ही तरी  करीत आहोत, हे दाखविण्यांचा पोलिस प्रयत्न करतात, तसा प्रयत्न दारूच्या बाबतीत दिसून येत नाही, कधी पकडतात? कुणाला पकडतात? पकडल्यानंतर कारवाई होते कि सेटींगमध्येच ही कारवाई पूर्ण होते? हा प्रश्न आहे आणि ठाणेदारांकडूनही हिच अपेक्षा आहे.

७ टिप्पण्या:

  1. इतर पत्रकारांनी काही फोन घ्यावा .

    उत्तर द्याहटवा
  2. या पत्रकारापासून इतरांनीही फोन घ्यावा.

    उत्तर द्याहटवा
  3. दारू पकडणे हे काम दारूबंदी विभागाचे असून तेच जबाबदार असतात...आणि गावात दारू कोण आणत आणि कशी आणत हे सर्व गावकऱ्यांना माहीत असत... जर गावकऱ्यांनी ठरवलं दारू प्यायची नाही आणि गावात दारू येऊन द्यायची नाही तर एक बाटली सुद्धा गावात येणार नाही.. उदा- अण्णा हजारे यांचे गाव.... गावातील काही पत्रकार आणि राजकारणी हेच जास्त हफ्ते खातात दारुवाल्याकडून.... पोलिसांनी ही कडक भूमिका घ्यावी

    उत्तर द्याहटवा
  4. Website चांगली मेन्टेन करा.... Next वर क्लिक केल्यानंतर पण तोच एकच एका पेज वरील बातम्या येत आहेत..������

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!