५७६०० रूपयाची देशी दारू जप्त



शंकरपूर पोलिसांची कारवाई

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - येथून जवळच असलेल्या शिवरा या गावातील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेतपरिसरात झोपडीमध्ये १२ पेटीत देशी दारू ५७६०० रूपयाची असल्याची गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी धाड टाकत  दारू जप्त केली असून शेतमालक आरोपी विरुद्ध कलम ६५ ई म.दा.का. गुन्हा दाखल करून माल जप्त करण्यात आला.सदरची कारवाई शंकरपूर चौकीचे सपोनी विनोद जांभळे, यांच्या नेतृत्वाखाली सपो.हवा.सुधाकर लोहटकर, अमित उरकुडे, परमेश्वर नागरगोजे, बनसोड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!