३ लाख ६ हजार ४६० रुपयांचा जूगारमाल जप्त १३ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल



शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : -  येथून जवळच असलेल्या किटाळी येथे एका घरामध्ये जुगार खेळत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत पाच मोटरसायकल रोख रुपये ५१२२० असा एकूण ३०६४६० रुपये मुद्देमालासह पोलिसांनी जप्त केला केला असून १३ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाही शंकरपूर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांच्या नेतृत्वात पोहेकाँ सुधाकर लोटकर, अमीद उरकुडे, परमेश्वर नागरगोजे, मंगेश बनसोड यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!