राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई ठरतोय जीवघेणा



कासव गतीने काम सुरू

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.०७/०८/२०२० आज सर्वत्र कोरोना कोविड - १९  या रोगाची साथ सुरु असून या महामारीमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच सोशल डिस्टन्स ,कलम १४४, तोंडाला मास्क वापरणे अनिवार्य , अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा असे निर्देश शासनाने जाहीर केले आहे.

आणि असे असतांना सुद्धा दैनंदिन चिमूर ते वरोरा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या मार्गाने हजारो लोक आप - आपल्या दुचाकी व चार चाकी वाहनाने प्रवास करीत असतात परंतु २ वर्षांपासून कासव गतीने सुरु असलेल्या या कामाकडे आमदार तथा खासदार व शासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
मागील २ वर्षांपासून या महामार्ग ३५३ ई वर अनेक जण मृत्युमुखी व जखमी  झाले असून. या महामार्गावर सेफ्टी च्या माध्यमातून काहिही नाही.दररोज मालवाहक ट्रक फसत असतात.ट्राफिक ला अडथळा निर्माण होत आहे.अशा प्रकारे जीव मुठीत धरून ठेवण्याची क्षमता कितपत योग्य ठरेल असा ? वाहन चालकास तसेच गावकऱ्यांना पडला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!