असोला मेंढा तलावाच्या ओव्हर फ्लो चे पर्यटकांच्या आनंदावर विरजन
असोला मेंढा तलावाच्या ओव्हर फ्लो चे पर्यटकांच्या आनंदावर विरजन
मनमोहक दृश्यापासून वंचित
असोला मेंढा तलावाच्या ओव्हर फ्लो चे मनमोहक दृश्य
जितेंद्र पेंदाम
उपसंपादक पवनपार / सिंदेवाही
असोला मेंढा तलाव गावांच्या मधोमध वसलेला आहे. पाथरी गावालगत भानापुर मेंढा उसरपार चक कन्हाळगांव सामदा टेकरी पवनपार पवना कोठा गुंजेवाही चिकमारा तांबेगडी मेंढा या सारख्या गावांच्या मधोमध निसर्गाच्या सौंदर्यात असोला मेंढा तलाव वसलेला आहे.
सांडव्या वरून खळखळनारे पाणी मनाला मोहून टाकते. तलावाच्या सभोवताल वनराईने तर सौंदर्यात भरच घातली आहे.
हे मोहक दृश्य बघायला अनेक दुर दूरचे पर्यटक येत असतात. कित्येक कुटूंब तर तिथे जेवन तयार करून मोठ्या आनंदाने सामुहिक भोजन करतात.
कित्येक युवक सांडव्यावरून वाहत असलेल्या पाण्यात न्हाहुन निघतात. काही मुलं मुली एकमेकाचे सेल्फी व फोटो घेतात.
असोला मेंढा तलावाचे ओव्हर फ्लो म्हणजे आनंदाची पर्वनी.
परीसरातील नागरीक ओव्हर फ्लो पाहायला मोठी गर्दी करतात.
यावर्षी असोला मेंढा तलावाचे ओव्हर फ्लो लवकर निघाल्याने पर्यटकाना जास्त दिवस आनंद घेता आला असता.
मात्र कोरोना विषानुच्या प्रादुर्भावाने जास्त लोकांची संचार बंदी व संबंधीत विभागाने लावलेले प्रतीबंध यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडले आहे.
प्रतीबंध केल्याने नागरीक जायला कचरत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!