मोहर्ली येथे डेंगू मलेरिया बद्दल जनजागृती करून कंटेनर सर्वे करण्यात आले
प्रितम साखरकर
दि. 07 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी गट ग्राम पंचायत मोहर्ली मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा वर्कर यांच्या मार्फत डेंगू मलेरिया विषयी जण जागृती करून कंटेनर सर्वे करण्यात आले. मोहर्ली मध्ये आरोग्य उपकेंद्रातील 8 लोकांची टीम प्रत्येक घरी जाऊन सांड पाणी, कुलर टाकी व इतर जमा असलेले पाणीचे ठिकाण चेक करने व प्रत्येकांना या पासून होणारे दुष्परिणाम सांगण्यात आले. आधीच चंद्रपुर जिल्ह्यत कोरोना बधितांची संख्येत वाढ होत आहे यात आणखी भर पडू नये म्हणून सगळ्यांनी परीसर स्वच्छ ठेवण्यास व साफ सफाई ने राहण्यास आरोग्य सेवक आर. जी. चव्हाण यांनी मोहर्ली च्या जनतेला सांगितले.
यावेळी आरोग्य सेवक आर. जी. चव्हाण, आरोग्य सेविका के. पी. राजूरकर , आशा वर्कर नितु ताई मेश्राम व आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी आदि उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!