जुना रेल्वे स्टेशन मधून जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण करा,मुल उलगुलान संघटनेची मागणी....


तालुका प्रतिनिधी:
गौरव शामकुले (मुल)

    
    
            नगर परिषद मुल अंतर्गत सार्वजनिक विभाग बांधकाम कार्यालयापासून ते जुना रेल्वे स्टेशन विहीरगाव पर्यंतचा रस्ता अत्यंत चिखलमय झालेला असून जाण्या येण्याकरिता येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मुल शहरातील मुख्य रस्त्या नंतर हा मार्ग जास्त रहदारीचा आहे. ह्या मार्गावर रहदारी करीत असताना पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल तयार झालेला आहे व त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. या वॉर्डातील नगरसेवकांना या रस्ता दुरुस्ती करण करण्याबाबत कित्येक वेळा सांगितले तरीही नगरसेवक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पावसात येथील नागरिकांना रहदारी करीत असताना त्रास होऊ नये करिता तात्काळ सदर रस्त्याचे खडीकरण करून बांधकाम करण्यात यावे करिता उलगुलान संघटना द्वारा कार्यकारी अधिकारी प्रकाश कागदलवार यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली...
    सदर रस्त्याचे तात्काळ बांधकाम करून रहदारी  करण्यात यावी जर वरील मागणी पूर्ण झाली नाही तर उलगुलान संघटना आक्रमक पवित्रा घेणार व तीव्र आंदोलन करणार असे निवेदन देताना करण्यात आले, निवेदन देताना उलगुलान मूल शाखाअध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे ,इ हजार होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!