पोळा निमित्त सर्जा राजा ने दिले मास्क वापरण्याचे संदेश

पोळा निमित्य सर्जा राजा ने दिले मास्क वापरण्याचे संदेश


पवनपार येथे शेतकर्यांनी केला घरीच पोळा उत्सव साजरा 



जितेंद्र पेंदाम


पवनपार येथे शेतकर्यांनी पोळा उत्सव घरच्या घरीच साजरा केला.अनेक वर्षाची परंपरा कोरोना ने खंडित होण्याच्या मार्गावर होती.
प्रशासनाने पोळा उत्सवावर बंदी घातल्याने शेतकर्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.
शेतकर्यांचा पोळा हा उत्सव आनंदाचा असतो. वर्ष भर बैला कडून शेतीचे कामे केली जातात . बैलाला आपन काहीही देत नाही. आणि बैल आपल्या कडुन तशी अपेक्षा करीत नाही.
त्याच्याप्रती कृतज्ञता प्रकट करण्याकरीता पोळा हा उत्सव साजरा केला जातो. 
या दिवशीं बैलाला काम करीत नाहीत. सकाळलाच बैल जोडीला आंघोळ घातली जाते. या दिवशी बैलाची पूजा केली जाते. चौकामधल्या देवळाजवळ असलेल्या नंदी बैलाला विळखा मारून तोरनातून बैलजोड़ी नेल्या जाते. विविध प्रकार चे झडत्या बोलून पोळा संपवून बैलजोड़ी ला जेवन दिल्या जाते.
यावर्षी मात्र या उत्सवावर बंदी घातल्याने शेतकर्यांनी बैलांना घरच्या घरीच सजवले. पंरपरेनुसार एका घरून एकच बैल जोड़ी मंदिराकडे येत गेल्या व प्रदक्षिना करून मोठ्या शिस्त लावून बैलजोड़ी घरी नेता गेल्याने आदर्श व  प्रशासनाच्या सुचने नुसारच पोळा उत्सव साजरा केला.
अनेक शेतकरी तर बैलांच्या तोंडाला मुसका बांधून आनल्याने त्यांनीतर कोरोनाच्या पार्श्वभूमीकेने तर संदेश च दिला. 
कोरोनासारख्या जिवघेण्या आजारावर तोंडाला मास्क वापरण्याचे संदेश दिला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!