चिरोली येथे जनावरांवर आलेल्या लम्‍पी रोगाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण.

चिरोली येथे जनावरांवर आलेल्या लम्‍पी रोगाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण.
 

मूल तालुक्यातील चिरोली येथे आज स्थानिक २०० जनावरांवर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने  लसिकरण करण्यात आले. 
स्थानिक शेतकरी व पशुपालकांनी पं. स. सदस्या सौ. वर्षा लोनबले यांना जनावरांना लागण होत चाललेल्या लम्पी रोगाची माहीती दिली. याची सविस्तर चौकशी करून सौ. लोनबले यांनी चिरोली येथे लसीकरण घेण्याकरिता पशुसंवर्धन विभागाकडे रितसर अर्ज केलेले होते.  या बाबीची तात्काळ दखल घेत चिरोली येथे आज जनावरांवर लसिकरण पार पडले. 
यावेळी, पं. स. सदस्या सौ. वर्षा लोनबले, प्रभाकर गंधेवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुळमेथे, उमेश परचाके, कृपदास दहिवले यांसह आदि मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!