आमगाव (महल) मध्ये मुसळधार पावसामुळे राहत्या घरावर पडले झाड






गडचिरोली (प्रतिनिधी)
नेहा बैस

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्या पासून काही अंतरावर असलेल्या आमगाव (महल) या गावात मुसळधार पावसाने आंबेडकर चौक इथे राहणारा सरदार पत्रु कुसराम वय 72 व त्यांची पत्नी सौ. अनुसया सरदार कुसराम यांच्या राहत्या घरा मध्ये  पिढ्यानपिढ्या पासून असलेले झाड पावसाच्या प्रभावामुळे दि. 06 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 च्या सुमारास सरदार कुसराम यांच्या घरावर पडला.



 
घरावर झाड पडल्यामुळे त्यांचे घर पूर्णपणे तस्तव्यस्त झाले आहे. ज्यावेळी ही घटना घडली होती तेव्हा सरदार व त्याची पत्नी हे घरातच होते. अचानक त्यांना होणारे घटनेचे स्मरण झाले आणि ते लगेच घरा बाहेर आले व त्यांच्या बाहेर येताच झाड घरावर पडले.  घरा बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली. 



सदर घटनेची माहिती ग्रामपंचायत आमगाव (महल) येथे केली  व  नुकसान भरपाईसाठी आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी मागणी केलेली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!