ताडोबाच्या वडाळा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन






चंद्रपुर :
मोहम्मद सुलेमान बेग

गेल्या काही दिवसांपासून मानव व वन्यजीव संघर्ष फार प्रमाणात वाढलेलं दिसून येत आहे .कधी वाघाच्या हल्यात गुराखी  ठार झाल्याची घटना ऐकण्यात येते तर कधी शेतात काम करणाऱ्यावर  वाघाचा हल्ला होतो. अशा प्रकारच्या मानव वन्यजीव संघर्ष  कमी करण्यासाठी लोकांशी सम्पर्क ठेवण्याच्या द्रुष्टीकोणातुन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगत बफर क्षेत्रातील वडाळा मध्ये त्याच्या संरक्षित वनांचे जागेत वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या नविन इमारती चे उद्घाटन  करण्यात आले .वडाळा ग्राम पंचायत चे सरपंच निरंजना उरकांडे यांचे हस्ते सोशल डिस्टंगसींनचे सर्व नियम पाळुन उद्घाटन करण्यात आले.

       यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रविण, उपसंचालक ना.सी.लडखत, सहाय्यक वनसंरक्षक एम.सी.खोरे, कुलकर्णी, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.के.शेंडे, श्री चव्हाण, श्री मुन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच वडाळा,आष्टा, घोसरी, खुटवंडा, सोनेगाव, कोकेवाडा, अर्जुनी येथील सरपंच, पोलिस पाटील व ग्राम स्तरिय ई.डी.सी. चे अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते. 

या समारंभाचे निमित्ताने क्षेत्र संचालक एन.आर.प्रविण यांनी मार्गदर्शन केले. तर समारंभाचे प्रास्थाविक वनपरिक्षेत्र अधिकारी एस.के.शेंडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!