घोडाझरी अभयारण्यातिल गेस्टहाऊस ला सील करा - निकेश रामटेके अध्यक्ष, आझाद युवा संघटना



तहसीलदारांना दिले निवेदन

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - देशात कोरोनाच्या दहशतीचे वातावरन चालु असतांना. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, कोअर झोन पुर्णतः बंद ठेवण्यात आले आहे. आणि बफर झोन जंगल सफारी जोमात सुरु आहे. व घोडाझरी अभयारन्य या सारख्या अभयारन्यांना बंद करुन का ठेवले आहेत. मात्र या शासनाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करुन परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात टाकनाऱ्या या घोडाझरी अभयारण्यातील रेस्टॉरंट ला बंद न ठेवता कॉरणटाईन साठी का वापरण्यात येत आहे. याकडे शासन लक्ष का देत नाही आत्ता तरी हे रेस्टॉरंट बंद होनार काय असा ? जनतेच्या समोर उपस्थित झाला आहे. वास्तविक पाहता घोडाझरी अभयारण्यात असलेल्या या गेस्टहाऊस ला लीजवर दिलेला आहे. त्या गेष्टहाऊस मध्ये येन्या - जान्याकरीता अभयारण्याच्या बाहेरच्या गावांमधुन डांबरी रस्ता असतांनाच मुद्दाम खुलेआम रात्री आणि दिवसा अभयारण्यातील रस्त्याचा वापर करुन नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. आणि आत्ता तर संयुक्त कोरंटाईन चे आदेश असतांनाच त्या आदेशाची पायमल्ली करून या घोडाझरी रेस्टॉरंट च्या ठीकानी तालुका वैद्यकीय अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या आशिर्वादाने तालुक्यातील राजकीय आशिर्वाद असलेल्या श्रीमंत मंडळींना या रेस्टॉरंट मध्ये कोरंटाईंन केले जातात.मात्र त्या ठीकाणी स्वयंपाकी, सफाई कामगार, गेट कीपर , हे सगडी मंडळी परिसरातील खडकी, हूमा, चक, मांगरुड या गावचे मजुर आहेत. आणी नकळतपणे त्या कोरंटाईन असलेल्या लोकांची सेवा करतात. अशाच प्रकारे ४ तारखेला त्या गेस्टहाउस मधे कोरंटाईन असलेल्या लोकांपैकी संपूर्ण लोकं कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे आजू बाजूच्या गावात दहशत पसरलेली आहे. व त्या गेस्टहाऊसमघे काम करनाऱ्या मुलांकडे शंकेच्या नजरेने पाहील्या जात आहे. तो गेस्टहाऊस आहे. तो सध्या बंद असायला पाहीजे. आणि त्या संशयितांना संयुक्त कोरंटाईन न करता या रिसॉर्ट मध्ये का ठेवन्यात येते . राजकीय किंवा श्रीमंत लोकांना पैशाच्या नादात संपूर्ण परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात टाकनाऱ्या  या रेस्टॉरंट ला सील करने फार गरजेच आहे. याकरीता आझाद युवा संघटनेच्या वतीने नागभीड चे तहसीलदार यांना निवेदन सादर करन्यात आले. यावेळी निवेदन देतांना निकेश रामटेके , पुरुशोत्तम रामटेके , बंडू राउत तथा आदी मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!