कातुर्ली येथिल महिलानी पकडली हात भट्टी मोहफुलाची दारू



भंडारा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - अड्याळ पोलिस स्टेशन अंतरग येनाऱ्या कातुर्ली येथे गेल्या १८ ते २० वर्षा पासुन कातुर्ली गावात दारु विक्रीला बन्दी होती. मात्र काहिदिवसा पासुन गावत दारू तयार केली जाते अशी चर्चा होती. गावातिल महिलांनी चर्चा करुन दारू विक्री व दारू तयार करनाऱ्याला पकडायचे व त्याना पोलिसांच्या स्वाधिन करायचे ठरवले .त्यात काल रात्री दि.१७/०८/२०२० गावातील महिलानी ८ वाजता शोध घेण्यासाठी गेले असता त्याना दोन अनोळखी व्यक्ती २५ लिटर मोहफुल दारू ची क्यान नेत असतांना दिसले व महिलानी त्याना पकडले  ते तिथुन क्यान ठेऊन  ते फ़रार झाले. महिलानी ति क्यान गावात आनुन पोलिस पाटील , तंटा मुक्ति अध्यक्ष ,सरपंच व गावकऱ्यांना महिती दिली. पोलिसाना बोलाऊन त्यांच्याकडे स्वाधिन केले. अवैध धंदे कातुर्ली परिसरात सुरु झाले तर पोलिस प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरती उतरन्याचा इशाराही महीलानी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!