बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार, एका आठवड्यातील दुसरी घटना

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार, 
एका आठवड्यातील दुसरी घटना
 🔘13 ऑगस्ट ला सावर्ला येथे 3 तीन शेळ्या तर 17 ऑगस्टला गंगासागर हेटी येथे 7 सात शेळ्या ठार.




तळोधी (बा.) यश कायरकर
                  तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र अंतर्गत गंगासागर हेटी गावातील श्री. माधव चिरकुटा डोंगरवार यांच्या गोठ्यात घुसून काल  17 ऑगस्टला रात्री 12:30 वाजता बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात शेळ्या जागीच ठार झाल्या. या घटनेमुळे श्री. माधव डोंगरवार यांचे 70 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे. घटनेची माहिती मिळताच आज सकळी वनक्षेत्र साहेब वनपरिक्षेत्र तळोधी, श्री के. डी. गरमडे व  श्री एस. एस. कुळमेथे वनरक्षक गंगासागर हेटी यांनी मोक्यावर पोहोचून मोक्का पंचनामा केला. व मृत शेळ्यांना योग्य ठिकाणी गाढण्यात आले.


 गंगासागर हेटी व सावर्ला हे गाव एकदमच जंगलालगत आहेत. जंगलात वाघ , बिबटे यांचे वावर आहे. विशेष म्हणजे काल याच परिसरात रेल्वेच्या धडकेने 5 वर्षीय अस्वलाचे मृत्यू झालेले होते. या परिसरात वन्यजीवांचे वावर जास्त असल्यामुळे लोकांनी सावधानी बाळगावी असे वनविभागाने सुचले सूचित केले आहे 
          मात्र परिसरात बिबट्याची दहशत वाढत चालल्यामुळे व शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्यामुळे वन विभागाने बिबट्याचे बंदोबस्त करावे असे परिसरातील जनतेची मागणी आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!