कविटपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात इसम जखमी
चंद्रपुर
मोहम्मद सुलेमान बेग :-
विरुर स्टेशन च्या परिसरातील कविटपेठ येथील एका इसमावर शेतातून घराकडे बैल घेऊन जातांना वाघाने हल्ला केला. या हमलेत त्यांचे प्राण वाचले. जखमीचे नाव तुळशीराम आत्राम वय 70 आहे. घटनेची माहिती वन विभागाला होताच घटनास्थळी पोहचून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गावा लगत जंगल असल्यामुळे मागील काही दिवसांपासून वाघ नेहमी गावाच्या शेत शिववारात येत होता. बरेच लोकांनी त्या वाघाला बघितलेले होते.दिनांक 20 जुलै रोजी संध्याकाळी पांचच्या सुमारास कविटपेठ गावातील तुळशीराम आत्राम वर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात सदर इसम फार जखमी झाला आहे.
रोज प्रमाणे आपल्या शेतातून घराकडे संध्याकाळी 5 वाजता च्या सुमारास रस्त्याने बैल घेऊन घराकडे येत असतांनी शिकार च्या फिराक मध्ये बसलेल्या वाघाने मागून येऊन त्याच्यावर हल्ला केला. यात तो फार जखमी झाला.
.यात त्याचे प्राण वाचले. अशा प्रकारचे जर हमले झाले तर गावकऱ्यांचे काय होणार ? ते कुठे जाणार
वन विभागाने सदर वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांने केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!