मोटेगाव हल्क्यातुन रेती तस्करी जोमात सुरू



महसूल अधिकारी यांचे दुर्लक्ष

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - चिमुर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या मोटेगावच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेती असल्याने रेती तस्करांनी जेसीपी च्या सहाय्याने रेतीचा उपसा करुन हायवा ट्रकने रेतीची वाहतूक (तस्करी )करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला आहे 
    नदीच्या पात्रातील जवळपास चारशे ब्रास रेती  हायवा गाडीने याठिकानची रेती चा जेसीबी च्या माध्यमातून रेती तस्करांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. गेली चार पाच दिवसापासून या ठिकाणची रेती अवैध रित्या जेसीपी लावून उपसा करण्यात येत होता आणी वाहतूक सुध्दा हायवा ट्रकने सुरू होती तरीही महसूल प्रशासनाने डोळे असुन आंधळ्याची भुमिका का घेतली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
  या प्रकरणी माजी जि.प.सदस्य विलास भाऊ डांगे यांनी तहसीलदार यांना भ्रमनध्वनी वरुन माहिती देण्याचा प्रयत्न केला तर साहेबांनी फोन रिसिव्ह केला नाही ,नंतर एसडिओ साहेबांना फोन केला व माहिती दिली आणी उपविभागीय अधिकारी यांनी मोटेगाव साझ्याचे तलाठी कांबळे, खांबाळा साझ्याच्या राठोळ मँडम, नेरी तलाठी निखाडे,आणी मंडळ निरीक्षक निखाळे यांना मौका चौकशीसाठी पाठविण्यात आले आणी नदीपात्रातील उपसा केलेल्या खड्याचा पंचनामा करण्यात आला तत्पूर्वी नदी पात्रातून काढून ठेवण्यात आलेल्या सत्तर ब्रास ट्रक्टर रेतीचा पंचनाम्यात एकशे विस ब्रास दाखविण्यात येवून निनावी कार्यवाही करण्यात आली आहे . हे सुध्दा एक गौडबंगाल आहे असे विलासभाऊ डांगे यांनी सांगितले आहे सुशिक्षित बेरोजगारांची ट्रकर पकडून कार्यवाही केली जाते. आणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनधास्त पने मोठाल्या गाड्या नदीपात्रात लावून हायवा ट्रकने रेतीची तस्करी करण्यात येत आहे. हे कोणाच्या आशिर्वादाने केले जाते असा प्रश्न विलास भाऊ डांगे यांनी उपस्थित केला आहे सदर प्रकरणी जिल्हा खनण विभागाकडून चौकशी करून खऱ्या रेती तस्कराला पकडून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा माजी.जि प.सदस्य विलास  डांगे यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!