रोजगारसेवक पुनर्नियुक्तीने रुजू, परंतु कामे देण्यास नकार
जुन्याच रोजगारसेवकाची पाठराखण
महादवाडी ग्रामपंचायतीचा उपटसुंभ कारभार
शासन आदेशाला केरोची टोपली
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील ग्रामपंचायतने एकतर्फी कारवाई करीत अचानक ग्राम रोजगार सेवक विलास दादाजी रामटेके यांना कामावरून कमी केले होते. अनेक प्रयत्नानंतर विभागीय आयुक्त नागपूर व जिल्हा परिषद चंद्रपूर कार्यालयाने नियमबाह्य रोजगारसेवकाची नियुक्ती रद्द केली व रामटेके यांना पुनर्नियुक्तीचे आदेश दिले. महादवाडी ग्रामपंचायतने रामटेके यांना रुजू करूनही घेतले़ मात्र, नियमबाह्य रोजगारसेवकाला कायम ठेवून त्यांच्याकडूनच कारभार सुरू आहे. त्यामुळे कामावर रुजू होऊनही विलास रामटेके हे आपल्या सेवा, कर्तव्यापासून वंचित आहेत. महादवाडी ग्रामपंचायत हा कार्यभार हम करे सो कायदा, या प्रकारातील आहे़.महादवाडी येथे २००८ पासून विलास रामटेके ग्राम रोजगारसेवक म्हणून कार्यरत होते. परंतु, त्यांच्यावर एकतर्फी कारवाई करीत ग्रामसभेत चुकीचा ठराव घेतला व कामावरून कमी करण्यात आले. त्यांच्याऐवजी नियमबाह्य पद्धतीने मजीर्तील व्यक्तीची नेमणूक रोजगार सेवक म्हणून करण्यात आली. रामटेके यांनी या अन्यायाबाबत विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर व जिल्हा परिषद चंद्रपूर कार्यालयात दाद मागितली़ त्यावर संबंधित प्रशासनाने सदर रोजगारसेवकाची नियुक्ती रद्द करून रामटेके यांना पुनश्च: रोजगार सेवकपदी घ्यावे, असे आदेश दिले. संवर्ग विकास अधिकारी, चिमूर यांच्या पत्रानंतर ग्रामपंचायत सचिवाने रामटेके यांना ३० जानेवारी २०२० रोजी रुजू केले. परंतु, कार्यरत नियमबाह्य रोजगार सेवकाची नियुक्ती रद्द केली नाही. यावरून महादवाडी ग्रामपंचायतने शासनाच्या आदेशाचे पूर्णपणे पालन केले नाही व वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याचे स्पष्ट होते. ग्रामपंचायतच्या या विचित्र कारभारामुळे मात्र कामवार रूजू झालेले विलास रामटेके आजही कामापासून वंचित आहे़.
--------------------- + ------------------------
पंचायत समितीचा महाप्रताप शासन आदेशानंतर ग्रामपंचायतने कामावरून कमी केलेल्या ग्राम रोजगारसेवक रामटेके यांना कामावर रूजू केले. परंतु, पूर्वीच्या रोजगार सेवकाला कायम ठेवले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनीही सवंर्ग विकास अधिकारी, चिमूर यांना पत्राद्वारे रामटेके यांना कार्यक्षेत्रातील काम देणे व अन्य कर्तव्य पूर्ण करण्यासाठी दोन वेळा पत्रव्यवहार केला़ परंतु, आजही पंचायत समिती पूर्वीच्याच रोजगारसेवकाची मस्टर, अंदाजपत्रके, हजेरी पत्रकावर स्वाक्षरी मान्य करण्याचा महाप्रताप करीत आहे. महादवाडी रोजगारसेवक प्रकरणाच्या विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर व जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशात तत्कालीन ग्रामपंचायत सचिव व सरपंचांवर कारवाई करावी, असे नमूद होते. परंतु, याबाबत सवंर्ग विकास अधिकाऱ्याने कारवाई करण्याचे कष्ट घेतले नाही.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!