कार चा अपघात झाल्यामुळे चिमूर पोलिसांची अवैद्य दारू तस्करीवर कारवाई



तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.०२/०७/२०२० रोजी रात्री ०२:०० वा च्या दरम्यान वरोरा ते चिमूर रोडने देशी दारूच्या मुद्देमालाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्याने तस्करांवर कारवाई करणे करीता चिमूर पोलीस पाळत ठेऊन बसले असताना एक पांढऱ्या रंगाच्या वाहनाचे शेंडेगाव येथील आठवले कॉलेज जवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता शेवरलेट कंपनीची कार क्रमांक. MH 31 CR 8728 मध्ये आरोपी १) रिझवान अब्दुल बशीर रा. नागपूर , २) कुणाल नागोराव हांडे रा. हिंगणघाट जी. वर्धा हे जखमी अवस्थेत अपघातग्रस्त वाहनात अडकून असल्याचे  दिसून आल्याने  शेंडेगाव येथील गावकऱ्यांचे मदतीने त्यांना तात्काळ अंबुलन्सने उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार कामी पाठवून वाहनात असलेल्या देशी दारूचा मुद्देमाल असा एकूण.४,५९,४०० रु चा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपितांवर कलम २७९,३३७,३३८,२६९,२७१,१८८भांदवी सह कलम ६५ अ, ८३ मदाका , ५१ ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा , कलम ३ साथीचा रोग प्रतिबंधक कायदा व १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाही अनुप तारे , उप विभागीय पोलीस अधिकारी मूल अति.कार्यभार चिमूर , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पो.स्टे. चिमूर यांचे मार्गदर्शनात पोउपनी अलीम शेख, पोहवा विलास सोनूले, विलास निमगडे , नापोशी किशोर बोढे, पोशी सतीश झिलपे, अवधूत खोब्रागडे, चापोशी विजय उपरे व शेंडेगाव येथील गावकरी मंडळी यांनी पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!