बना योगी - रहा निरोगी
बना योगी - रहा निरोगी
◆ 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त विशेष लेख-
लेखिका-
यशोधरा सोनेवाने गोंदिया
संकलन- अतुल खोब्रागडे/गोंदिया
योग जीवन काळाची गरज आहे.आजचे जीवन इतके धकाधकीचे व गतीमान झालेले आहे की,आपण आपल्याच शारीरिक व मानसिक आरोग्यापासून वंचित होत आहोत. आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी *योगाभ्यास साधना* करणे हे आजची आवश्यकता बनली आहे.खरं तर योगाभ्यास म्हटले की,आसन,सूर्यनमस्कार,प्राणायाम एवढेच येते पण, योगाभ्यासाची व्याप्ती खुप मोठी आहे. यात शरीर व मन स्वासाच्या एक लयबद्धतेत आनणे.स्थिर सुखम् आसन.अर्थात स्थिर पण सुखावह वाटणारी स्थिती म्हणजे आसन होय.
योगाभ्यास भारतातील पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे.खरेतर गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “योग म्हणजे हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.”
योग दहा हजार पेक्षा जास्त वर्षापासून प्रचलित आहे. या परंपरेचा उल्लेख नारद भक्ती सुत्र आणि सर्वात प्राचीन अश्या ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवितो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अतिप्राचीन उपनिषद बृहद अरण्यक मध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा उल्लेख आढळतो.
योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या विकासासाठी आवश्यक प्रक्रियेच्या रुपात जाणले जाते.अथर्ववेद मध्ये संन्याश्यांच्या एका समुहामधील चर्चेनुसार शारीरिक आसने हि योगासने म्हणून विकसित होऊ शकतात यावर भर दिला आहे. विविध संहितांमध्ये असा उल्लेख आढळतो कि प्राचीन काळी मुनी, महात्मा आणि विविध संतांद्वारे कठोर शारीरिक आचरण, ध्यान आणि तप केले जात असे.महाभारत आणि भगवत गीतेच्या फार पूर्वी वीस पेक्षा ज्यादा उपनिषदामध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मिलन होणे म्हणजे ‘योग’ असे सांगितले गेले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मुलभूत सूत्रांच्या रुपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा अलंकृत उल्लेख पतंजली योग सूत्रामध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसऱ्याच योग सूत्र मध्ये
पतंजलींचे लेखन देखील अष्टांग योग साठी आधार बनले आहेत. जैन धर्मातील पांच प्रतिज्ञा आणि बौध्द धर्मातील योगाचाराची बीजे पतंजली योग सूत्रामध्ये आहेत.मध्य कालीन युगात हठ योगाचा विकास झाला.
'पतंजली योग सूत्र' या प्राचीन ग्रंथावरील गुरुदेवांची अमुल्य प्रवचने आपल्याला योग ज्ञानाबाबत लाभान्वित करतात तसेच योगाची उत्पती आणि उद्देशांबाबत माहिती करून देतात. योगाची तत्वे, सिद्धांत बनवणे आणि सूत्रांना समजण्यास आणखी सोपे बनवणे हाच या योगसूत्रांचा उद्देश आहे. यामध्ये योग जीवनशैलीचा उपयोग योगाच्या अंतिम लाभांचा अनुभव होण्यास सहाय्यभूत अशा आपले लक्ष केंद्रित करणाऱ्या काही प्रक्रियांचा उल्लेख आहे. गुरुदेवांनी देखील योगसूत्र उपनिषदांचा खूप खुलासा केला आहे. भगवत गीता वरील आपल्या प्रवचनामध्ये त्यांनी सांख्ययोग, कर्मयोग, भक्तियोग राजगुह्य योग आणि विभूतियोगा सारख्या योगाच्या विविध अंगावर प्रकाश टाकला आहे.
श्री श्री योगा अशी परिपूर्ण जीवनशैली आहे ज्यामध्ये योगाच्या सर्व प्राचीन तत्वांचा अंतर्भाव आहे, जेणेकरून कृतज्ञ आणि शिस्तबध्द शरीर, मन आणि आत्मा एकत्र होऊ शकतो. एका क्रमाने प्रभावी योगासने, प्राणायाम आणि ध्यानाच्या आंतरिक अनुभवावर भर दिला जातो. कारण मानसिक स्वास्थ्य आणि मानवी अस्तित्वाच्या काही छुप्या तत्वांसाठी हे गरजेचे आहे. असा अनुभव आहे कि जेंव्हा एखाद्याच्यात सद्भाव, सात्विकता असते तेंव्हा त्यांचे जीवन शांत, सुखद आणि परिपूर्ण होते.
श्री श्री योग शिबिरामध्ये विविध योग प्रक्रियांना शास्त्रोक्त, पूर्णपणे आणि सुलभतेने शिकवले जाते. या शिबिराद्वारे निरोगी शरीर, शांत मन, ध्यान लागणे आणि आत्मविश्वास बळावण्यासाठी सर्वांगीण समतोल प्राप्त होतो. यामध्ये योगाच्या नवागतासाठी एक परिपूर्ण पॅकेज आहे तर सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी काही न काही उपलब्धी आहे.
श्री श्री योग चा नियमित सराव करणाऱ्यांच्या जीवनशैली मध्ये उल्लेखनीय परिवर्तन झाले आहे. त्यांचे जुने आजार नाहीसे झाले, त्यांच्या वागणुकीत बदल झाले. शिबिरार्थीनी आरोग्य प्राप्ती झाली, चिंता घटल्या, आनंद वृद्धी, सहिष्णुता वृद्धी आणि सजगतेमध्ये वृद्धी झाल्याचे अनुभव सांगितले आहेत.
श्री श्री योग आरोग्याचा आणि आनंदाचा मोठा खजिना आहे.
सर्वांसाठी योग .योगाचे एक वैशिष्ट्य हे आहे की, आपण युवक असा किंवा वयोवृध्द, निरोगी असा वा आजारी, वयाची मर्यादा नसते. योगाभ्यास सर्वांसाठी लाभदायक आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो. वयोमानापरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्वता होऊ लागते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सुक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो. योग आपल्यासाठी कधीही नवीन नव्हता. आपण हे सर्व अगदी बालपणापासून करत आलो आहोत, मग ते पाठीचा कणा मजबूत करणारे मांजरासन असो कि पचनशक्ती वाढवणारे पवनमुक्तासन असो. आपण शिशूंना दिवसभर काही न काही योग क्रिया करताना पाहतो. हर एक व्यक्तीला योगाचे वेगवेगळे महत्व आणि आवश्यकता आहे. योग प्रत्येकाच्या जीवनाची आदर्श दिशा ठरवण्यासाठी सहाय्य करायला दृढ संकल्प आहे.
प्राणायाम आणि ध्यान प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोश्वसाच्या योग्य तंत्रांचा सराव केल्यास रक्तामधील आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन ऊर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि योगासने हे एकमेकास पूरक आहेत. या दोन योगतत्वांचा मिलाफ झाल्याने शरीर आणि मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्मनियमन प्राप्त होते.चला तर मग आपल्या दैनंदिनीत नित्य योग करून निरामय आनंदी जीवन जगू या.
सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया
(9420516306 )


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!