चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीचा "आक्रोश प्रदर्शन"
आम आदमी पक्षाचे जटपुरा गेट चंद्रपुर येथे आक्रोश प्रदर्शन
चंद्रपूर (प्रतिनिधी)
चीन कडून भारतीय जवानांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीन निर्मित कोरोनाच्या संकटाचा भारतासह जगातील जवळपास सर्वच देश कसोशीने सामना करत आहे. अशावेळी कुठलीही मानवता न बाळगता चीन भारतीय सीमारेषेवर तणाव निर्माण करू पाहत आहे, याचा आम आदमी पक्ष तीव्र निषेध करीत आहे. या संकट समयी संपूर्ण देशाच्या सद्भावना आपल्या वीर जवानांच्या पाठीशी आहेत हे सांगण्यासाठी आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याकडून गाव, तालुका, जिल्हा व शहर पातळीवर राज्यभर "आक्रोश प्रदर्शन" करण्यात आले. या ठिकाणी आपल्या वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. तसेच चीन विरोधात निषेध म्हणून आक्रोश व्यक्त करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत, शारिरीक अंतर ठेवून मास्क लाऊन, प्रशासनाला कुठलीही त्रास न देता, आम आदमी पक्षाचे कार्यकर्त्यानी राज्यव्यापी आक्रोश प्रदर्शन करण्यात आले.
हे आक्रोश प्रदर्शन आपच्या राज्य समिती सदस्य अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे मार्गदर्शनात, जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे यांचे नेतृत्वात संतोष दोरखंडे, भिवराज सोनी, राजु कुडे, दिलीप तेलंग, मयूर राईकवार, सुनील भोयर, योगेश आपटे, प्रशान्त एरने, देवकी देशकर, राजेश चेड़गुलवार, शंकर धुमाळे, राजू कूड़े, विशाल भाले, रामदास पोटे, राशिद शेख, मुजफ़र खान, अमजद शेख, मीणा शेगोकर, सुभाष शेगोकर , अशोक आनंदे , अजय डुकरे तसेच ईतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हे आक्रोश आंदोलन बल्लारपुर येथे परमजीतसींग झगडे बलराम केसकर यांचे नेतॄत्वात मुल येथे अमित राऊत यांचे नेतृत्वात सावली येथे हे अनिल मडावी यांचे नेतृत्वात तर सिंदेवाही येथे मनोहरराव पवार, शशिकांत बतकमवार यांचे नेतृत्वात तर चिमुर येथे अजय पीसे यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!