चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी सप्टेंबर महिन्यात उठवणारच! विजय वडेट्टीवार
चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी सप्टेंबर महिन्यात उठवणारच - नाम. विजय वडेट्टीवार
शंकरपुर:- जगदीश पेंदाम
येत्या काही दिवसात शासकीय स्तरावरील समित्या मध्ये महाविकास आघाडीतील पक्षातील पदाधिाऱ्यांनीही विश्वासात घेवून सामावून लवकर समित्या गठीत करणार असल्याचे सांगत नाम. विजय वडेट्टीवार म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना दारुचा महापूर आहे दारू बंदी असल्याने बोगस दारू मुळे आरोग्य धोक्यात येत असून शासनाचा महसूल बुडत आहे जिल्ह्यातील दारू बंदी उठवायची होती परंतु सध्यस्थीतीत कोरोना कोविड महामारी असल्याने दारूबंदी उठविण्यास विलंब होत असले तरी येत्या सप्टेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दारू उठविणार असल्याचे ठाम सांगत आपण कोणत्याही आंदोलनास घाबरणारे नसल्याचे सुद्धा सांगितले
ग्रामगीता महाविद्यालय चिमूर भेट दरम्यान पालकमंत्री विजय वड्डेटीवार बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ, तहसीलदार संजय नागतिळक, मुख्याधिकारी मंगेश खवले, काग्रेस जिल्हा सरचिणीस तथा जील्हा परिषद सदस्य गजानन बुटके सहकार नेते संजय डोंगरे सरपंच रामदास सहारे नगर परिषद उपाध्यक्ष तुषार शिंदे मनीष नंदेश्वर प्रा राम राऊत राजू लोणारे प्रमोद दांडेकर सुनील दाभेकर माजी पंचायत समिति सदस्य ओम खैरे प्राचार्य धम्मणी उपस्थित होते
दरम्यान नामदार विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी कार्यकर्त्यांच्या समस्येवर चर्चा केली बरेच कार्यकर्ते उपस्थित होते...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!