उप कार्यकारी अभियंता संजय जळगावकर,मुख्याधिकारी मंगेश खवले व पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे यांचा,चिमूर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे गौरव
कोरोणातंर्गत जबाबदारीपुर्वक व संवेदनशीलपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकाऱ्याचा सत्कार
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - कोरोणा संक्रमणतेला अनुसरून,चिमूर तालुक्यातील ज्या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे हित लक्षात घेता,त्यांच्या सुरक्षेसाठी सतर्कतेला अनुसरून दक्ष होत जबाबदारी पार पाडली अशा संवेदनशील अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा चिमूर द्वारा सत्कार व गौरव करण्यात आला.
चिमूर येथील विज वितरण कंपनी कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता संजय जळगावकर हे मृदू भाषी असून मनमिळावू स्वभावाचे आहेत.स्वत:च्या मनावर त्यांचे नियंत्रण आहे.शांतपणे समजावून सांगण्याची त्यांची कार्यपद्धत चिमूर तालुक्यातील नागरिकांसाठी हितवाहक ठरली आहे.
याचबरोबर चिमूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश खवले हे कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात.समयसुचकते नुसार कार्य करण्याची त्यांची कार्यपद्धत चिमूर नगरपरिषदे अंतर्गत नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे चिन्हे आहेत.ते आपल्या कर्तव्यक्षमतेला अनुसरून न्याय भुमिका अंतर्गत न्यायोचित कर्तव्य पार पाडतात.
तद्वतच चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल धुळे हे सदैव धडपडणारे व्यक्तीत्व आहे.ते समयसूचकता दाखवीत आपले कर्तव्य पार पाडतात.त्यांच्या मनात नेमके काय दडलेले आहे हे त्यांच्या बोलण्यातून खुलासेवार स्पष्ट करतात.परंतू खाकी वर्दीचा दरारा हा जनहितार्थ ठरण्यासाठी त्यांची धडपड दखलपात्र आहे.
वरील तिन्ही अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोरोणा संक्रमणतेला अनुसरून संचारबंदी काळात,जनतेच्या सुरक्षेसाठी व उत्तम आरोग्यासाठी केलेले कार्ये हे वाख्यान्याजोगे आहे.त्यांच्या कर्तव्यामुळे चिमूर तालुक्यातील नागरिक सध्यास्थित पुर्णतः सुरक्षित आहेत.
त्यांचे संचारबंदी काळातील उत्कृष्ट कार्ये बघता,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा चिमूरच्या वतीने,त्यांच्याच कार्यालयात त्यांचा पुष्पगुच्छ व शाल द्वारा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला व गौरव पत्राद्वारे सन्मानपूर्वक सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रांताध्यक्ष वसंत मुंडे साहेब,यांच्या उदात्त संकल्पनेतून, संचारबंदी काळातील उत्कृष्ट कार्यासाठी,अधिकारी-कर्मचारी व इतर क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना "कोरोणा योध्दा,असे सन्मानपूर्वक संबोधण्यात आले आहे.म्हणूनच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रांताध्यक्ष वसंत मुंडे साहेब,राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे साहेब व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी,कर्मचारी,व इतर क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचा,विदर्भासह अख्या महाराष्ट्र राज्यात,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पादाधिकारी आपापल्या परीने सत्कार व गौरव करीत आहेत.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून चिमूर तालुक्यात राबविण्यात आला व चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांचा,कर्मचाऱ्यांचा,इतर क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचा,चिमूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे आदरपूर्वक सत्कार व सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
सर्व आदरणीय व्यक्तींचा सत्कार व गौरव करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके,चिमूर तालुका अध्यक्ष केवलसींग जुनी,सरचिटणीस डॉ.कृष्णकुमार टोंगे,उपाध्यक्ष प्रमोद राऊत,दामोधर रामटेके,प्रशिध्दीप्रमुख सुरज नरुले,संघटक विलास मोहिनकर,सहसंघटक उपक्षम रामटेके,सदस्य योगेश अगळे व दखल न्युजचे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी,सुनील हिंगणकर प्रामुख्याने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!