नागरिकांना विज बिल हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत देण्याची युवा सेनेची मागणी
महाराष्ट्र राज्य विधुत विरतरण कंपनीच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - वरोरा कोरोनाला जागतीक महामारी घोषित करून देशात व राज्यात सलग तीन महिने लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. परिणामी नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतआहे. शासनाने सुद्धा तीन महिने बिल भरण्याची सवलत दिली होती मात्र आता सरसकट तीन महिन्याचे वीज बिल नागरिकांना प्राप्त झाले असून नागरिकांना एकदमच बिल भरण्याची सक्ती करू नये, वीज बिल हप्त्यामध्ये भरण्याची सवलत द्यावी अश्या विविध मागण्या करिता युवा सेनेचे मनीष जेठणी यांनी म. रा. वि. वि कंपनी ली. च्या वरोरा येथील उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले आहे.
मार्च महिन्या पासून देशात व राज्यात लॉकडाऊन आहे. बहुतांश नागरिकाना आर्थिक फटका बसला आहे .बरेच नागरीक आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत. महावितरण कडून नागरिकांना मार्च,एप्रिल,मे असे तीन महिन्याचे एकत्र वीज बिल प्राप्त झालेले आहे मात्र ते सरसकट तीन महिन्याचे बिल एकत्र भरण्याची सक्ती न करता हफत्यांन मधे भरण्याची मुभा द्यावी .वीज बिलावर व्याज व विलंब शुल्लक आकारू नये . वीज बिल भरणा करण्यास विलंब झाल्यास ग्राहकांचा विधुत पुरवठा खंडित करू नये .
अश्या मागण्याचे निवेदन युवा सेनेचे जिल्हा चिटणीस मनीष जेठणी व त्यांच्या शिष्टमंडळाने वरोरा येथील महाराष्ट्र राज्य विधुत विरतरण कंपनीच्या उपविभागीय अभियंत्यांना दिले यावेळी वाहतूक सेना तालुका प्रमुख अमर सिंग,कंत्राटी कामगार सेना शहर प्रमुख बालू रुयारकर,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा,सुनील दुगड व असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते .
महाराष्ट्र राज्य विधुत विरतरण कंपनीच्या उपविभागीय अभियंत्यांना दिलेल्या
निवेदनाची प्रतिलिपी वरोराच्या तहीसलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ऊर्जामंत्री नितीनजी राऊत, पालकमंत्री विजय वडेट्टीवार या पाठवले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!