रॉयल युथ गृप शिवापूर बंदर WCL कॉलोनी आणि ब्लड बँक गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न
३२ व्यक्तींनी केले रक्त दान
चिमूर - तालुका प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.०३/०६/२०२० कोरोना कोविड - १९ या विषाणू ची संपूर्ण विश्वात सर्वत्र साथ सुरू असून शासनाने मनोबल (huminity powar) वाढवायला संगीतले असून कोरोना या रोगाला न घाबरता रॉयल युथ ग्रुप शिवापूर बंदर WCL कॉलनी व शासकीय ब्लड बँक गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त दान कार्यक्रम बुधवारला सकाळी ठिक ०९:३० वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवापूर बंदर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.याठिकाणी ३२ पुरुष व महिलांनी रक्त दान केले. या कार्यक्रमाचे उध्दघाटक प्रा.जितेंद्रकुमार चरडे , वरीष्ठ मॅनेजर WCL मुरपार तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भरोष ढोक सरपंच शिवापूर बंदर , कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विनोद चौधरी मुरपार , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. पंकज निखाडे तर कार्यक्रमाचे संचालन अनिरुध्द वासनिक यानी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश नंन्नावरे व कार्यक्रमाचे आभार आदित्य वासनिक यांनी मानले या शिबिराचे मोठ्या प्रमाणात चिमूर तालुक्यात कौतुक केले जात आहे.



Bhut bdiya.. all are doing very good job... we are corona worrier
उत्तर द्याहटवा