खुनी रस्ते आणि जिवघेणा विकास

तलोधी (बा.) यश कायरकर


खुनी रस्ते आणि जिवघेणा विकास
बांधकाम विभागाचे अभियंते अधिकारी पार्टी व टक्केवारी घेऊन कुंभकर्णि झोपेत.
सविस्तर वृत्त
नागभीड- मुल रस्त्याच्या दुतर्फा कामाला व तळोधी परिसरातील रस्ते कामाला वर्षेभरा पुर्वी च सुरुवात झाली. आणि कासवगतीने सुरू असलेल्या कामाला लाँकडाऊन ने घरघर लावली. आणि पुन्हा काम कासवगतीने सुरुही झाला. आणि संबंधित अभियंता रोजच पाहनी करायला साईटवर येतातही मात्रकामातील अनियमितता त्यांना दिसतच नाही. आणि त्यामुळे प्रवासी वाहतूक व जनतेच्या सोबतच शासनाची सुध्दा मोठी हानी होते आहे.
या रस्त्यांचे काम करीत असतांनाच पुलांची कामे सूध्दा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहेत. त्यामुळे दळणवळण रितसर सुरू रहायला पर्यायी वळण मार्ग करन्यात आले. पण ते थातूरमातूरच. आसाच हा तळोधी च्या महात्मा फुले काँलेज च्या मागील बाजूस बनविलेला पर्यायी वळणमार्ग. जिव मुठीत धरून येथुन दुचाकी चालवावी लागले. आणि आज परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचून वाहतुकीची कोंडी झाली आहे.
अशा प्रकारच्या जनकापुर जवळील वळणमार्गाने तळोधी येथील महात्मा फुले काँलेज च्या दोन शिक्षकांचा बळी घेतला होता. अशी कित्येक घटनात या नित्क्रुष्ट आणि कुचकामी वळणमार्गांनी लोकांची जिव घेतली आहे. मात्र विभागझोपेतून आत्ता तरी जागा व्हायला हवा. असे लोकांना वाटत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!