ट्रॅक्टरने टक्कर मारून खून.
ट्रॅक्टरने टक्कर मारून खून.
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
शुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीने ट्रॅक्टर ने टक्कर मारून खून केल्याची घटना शंकरपूर येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली आहे दयाराम रंदये (62) मृतकाचे नाव असुन पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन माळवे वय 19 वर्ष व दयाराम रंदये हे दोघेही घराशेजारी राहत असून यांच्यात मंगळवार ला सायंकाळच्या दरम्यान शुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणात रोहन माळवे यांनी तुला ट्रॅक्टरने उडवून देतो अशी धमकी दिली होती. बुधवार ला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान मंडळ कृषी कार्यालय जवळ रोहन मांडवे यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरने रस्त्यावरून जात असलेल्या दयाराम रंदये यांच्यावर ट्रॅक्टर ने टक्कर मारून गंभीर रित्या जखमी केले. त्याला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे नेले असता तिथे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी रोहन माळवे यांना अटक करण्यात आली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस स्टेशन ठाणेदार विनोद जांभळे करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!