वरोरा सब्जी मंडी परिसरात सडलेल्या टाकाऊ भाजीपालावर अळ्या असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात



चंद्रपुर:-
मोहम्मद सुलेमान बेग


चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा शहरात प्रसिद्ध सब्जी मंडी म्हणून ओढकले जात असून मोठ्या प्रमाणात सब्जी येथील ठोक सब्जी व्यापाऱ्यांकडे नागपूर-कळमना येथून माल विक्रीसाठी येत असतात. या परिसरसतील ठोक व चिल्लर व्यापारी
खराब झालेला भाजीपाला त्याच परिसरात इतरत्र टाकत असल्यामुळे ते सडतात आणि मग त्यामध्ये अळ्या पडून वास सुटतो त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
सडक्या भाजीवर अळ्या पडल्याचे आढळून आले असून,नगर परिषद प्रशासनांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकां कडून होत आहे.
वरोरा शहरातील सब्जी मंडी परिसरात सब्जी मंडी सोबत त्या ठिकाणी मटण मार्केट,मच्छी मार्केट, विविध प्रकारच्या वस्तूं विक्री करिता दुकाने असून, त्यापरिसरात हजारो नागरिक राहत असून सब्जी मंडी मध्ये हजारो ग्राहक भाजी खरेदी साठी येत असतात. परंतु, नगर परिषदनी टाकाऊ कचरा टाकण्यासाठी वरोरा मध्ये कचरा कुंड्या ठेवल्या आलेले असतांना सुद्धा भाजीपाला व्यापारी इतरत्र कुठेही खराब भाजीपाला टाकत असल्याने,तो कुजतो,सडतो, वास येतो तसेच त्यामध्ये जंत पडून नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो .असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत आहे ह्या गंबीर समस्ये ची दखल नगर पालिका केव्हा घेणार या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!