वीज बिल माफ करा* -ऑ. पारोमिता गोस्वामी







चंद्रपुर :-
मोहम्मद सुलेमान बेग

राज्यात कोरोनाच्या महामारी मुळे लॉक डाऊन जाहीर केले गेले .त्यामुळे राज्याचे अर्थव्यवस्थेचे चक्र थांबलेली असून अनेक कुटुंबीयांची आर्थिक नियोजन बिघडले आहे. अनेकांना रोजगार नाही त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसे करावे हा प्रश्न निर्माण होत असताना वीज महावितरण कंपनीने अचानक तीन महिन्याचा एकत्रित बिल पाठवून अनेकांचे कंबरडे मोडले आहे.

महावितरण कंपनीने सरसकट 3 महिन्याचा बिल देणे. हा नागरिकावर एक प्रकारचा अन्याय आहे. महावितरण कंपनीने आकारलेला वीज बिल माफ करावे अशा आशयाचे निवेदन आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य समिती सदस्य ऑ .पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी ब्रम्हपुरी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्यांना पाठविलेल्या निवेदनात मागणी केली आहे. निवेदन देतांना आम आदमी पार्टीचे शांताराम मेश्राम,
रमेश दिघोरे, प्रतिभा मैंद,अनुराधा कोसे, हरीचंद भानारकर,गीता इंदुरकर,प्रणिता रामटेके,दीपा उंदिरवाडे ,माया चहांदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!