शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यास वाघाने केले ठार



नागभीड (यश कायरकर)
        वनपरिक्षेत्र नागभीड अंतर्गत तुकूम येथील शेतकरी राजेंद्र संभाजी गणवीर (55) काल आपल्या शेतावर काम करीत असताना  शेताला लागून असलेल्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतात येऊन ठार मारले व प्रेत घटना स्थळावरून 150 मीटर दूर घनदाट जंगलात ओढत नेले...सकाळी 9 च्या दरम्यान शेतात गेलेले राजेंद्र गणवीर सायंकाळी झाली तरी शेतावरून परत न आल्याने कुटुंबाच्या मनात शंका येताच पाच ते सहा शेजाऱ्यांच्या मदतीने शेताच्या आजूबाजूचा परिसरात शोध घेतला परंतु अंधार झाल्याने घटना स्थळावर चपला व इतर साहित्य  पडलेले होते.रात्री उशिरा घरी परतले न नागभीड पोलीस स्टेशन ला माहिती दिली.. व पुन्हा सकाळी शेतात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मृतकाच्या चपला व वाघाच्या पंजाचे ठसे दिसून आले सदर 150 ते 250 मीटर जंगल परिसरात शोध घेतला असता राजेंद्र गणवीर यांचा त्यांच्या शेतापासून 150 मीटर अंतरावर नागभीड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र.624 मध्ये अर्धवट खालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.
      तुकूम परिसरातील वाघाने हल्ला करून ठार केल्याची ही पहिलीच घटना असून शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच या वाघाचा वनविभागाने शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागनी गावकऱ्यांकडून होत आहे.. वनविभागाच्या वतीने सदर परिसरात ट्रॅप कॅमेरा लावण्यात आलेले आहेत.
        सदर शेतकऱ्याच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.
    घटना स्थळी पोलीस व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित राहून मोक्का पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आला.
     सदर मृतक राजेंद्र गणवीर यांच्या कुटूंबाला वनविभागाच्या मदतीने तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली.. घटना स्थळी नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड,वनरक्षक राहुल बुरले, वनरक्षक राहुल वगारे,पोलीस निरीक्षक सोनेकर, झेप निसर्गमित्र संस्थेचे डॉ.पवन नागरे,जि.प. सदस्य संजय गजपुरे,नगरपरिषद उपाध्यक्ष गणेश तर्वेकर,नगरपरिषद बांधकाम सभापती सचिन आकुलवार यांची उपस्थिती होती..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!