अवैध रेती उत्खनन प्रकरणात पकडण्यात आलेल्या अनेक ट्रॅक्टरांची चिमूर तहसील व उप कोषागार कार्यालय समोरील आवारातून गेले मोठ्या प्रमाणात साहित्य चोरी



सेल्फ,चाक,बॅटरी,अलटीनेटर,इंजिन, सह ईतर साहित्य चोरी यास जवाबदार कोण ? ट्रॅकटर मालकांनी केला तहसीलदारांना प्रश्न ?

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.१८ जून २०२० आज संपूर्ण विश्वात कोरोना कोविड - १९ या विषाणूजन्य आजाराची साथ , संचारबंदी , लॉक डाऊन , कलम १४४ सुरु आहे.आणि चिमूर तालुक्यामध्ये होत असलेल्या अवैध रेती वाहतूक प्रकरणी महसूल विभागातील तलाठी, तहसीलदार ,उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जप्त करण्यात आलेल्या अवैध रेती वाहतुकीत ट्रॅक्टर जप्त केलेल्या ट्रॅकटरचे  तहसील कार्यालय व उप कोशागार कार्यालय चिमूर च्या समोरील आवारात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर जप्त  करून ठेवल्या जातात.
परंतु त्या जप्त ट्रॅक्टरचे चाक, सेल्फ ,हायड्रोलिक किट, बॅटरी,सायलेन्सर व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने ट्रॅकटर मालकांना मोठा धक्का बसला असून शासकिय परिसरातील चोरी गेलेल्या वस्तूची जबाबदारी कोणाची असा प्रश्न करीत जप्त केलेला ट्रॅक्टर सोडविण्याकरिता एका ट्रॅक्टरच्या मागे १ लाख १० हजार ९०० रुपये चालनाच्या स्वरूपात भरावे लागत आहे.
तसेच चोरी गेलेले साहित्य नवीन खरेदीसाठी पुन्हा साठ - सत्तर हजार रुपये लागत असल्याने ट्रॅक्टर मालकावर हा मोठा भुरदंड असून आज शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही ट्रॅक्टर फायनान्स आहेत व ३ महिने झाले लॉक डाऊन आहे .त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर चे साहित्य चोरी जातात तरी कसे असा प्रश्न ट्रॅकटर मालक रवी जाधव यांनी तहसीलदार संजय नाटिळक यांच्यासमोर उपस्थित केला आहे .


मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील कुठल्याही  रेती घाटाचे लिलाव न झाल्याने मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यात आणि तालुक्यात अवैध रित्या  रेतीची वाहतूक सुरू आहे  या अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्याकरीता महसूल विभागातील तलाठी , मंडळ अधिकारी,तहसीलदार ,वेळप्रसंगी उपविभागीय अधिकारी अशा अवैध  रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटर ला पकडून जप्त करतात व जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या व उप कोषागार कार्यालय चिमूर च्या प्रांगणात मागील बाजूस लावण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून नुकतेच ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस लावलेले असताना आजच चिमूर येथील ट्रॅक्टर मालक रवी जाधव यांनी महसूल विभागाच्या नियमानुसार एका ट्रॅक्टरची दंडाची रक्कम १ लाख १० हजार  ९०० रुपये भरली आणि ट्रॅकटर नेण्यासाठी  तहसील कार्यालयाचे मागील बाजूला गेले असता ट्रॅक्टर चे सायलेन्सर,बॅटरी, सेल्फ ,चाक ,हायड्रोलिक साहित्य इतर साहित्य चोरी गेलेले आढळून आलेले  नाही. त्यामुळे धक्का बसला  तर त्यांच्या इतर ट्रॅक्टरची त्यांनी पाहणी केली असता ट्रॅक्टर चे साहित्य चोरी गेल्याचे आढळून आले त्यांनी याबाबत  महसूल विभागातील अधिकारी यांना विचारणा केली असता ट्रॅक्टर राखत  बंदूक घेऊन पाहत राहू का ? असे उत्तर मिळाल्याचे त्यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले.
          ट्रॅक्टर सोडण्याकरिता गेले असताना मालकांना दंडाची रक्कम १ लाख १० हजार ९०० रुपये व इतर सामान चोरी गेलेले असे साठ-सत्तर हजार रुपये असं दीड पावणे दोन लाख रुपयांचा भुर्दंड त्या ट्रॅक्टर मालकावर भुर्दंड बसत असल्याने व महसूल प्रशासनाच्या परिसरातून कार्यालयाला वॉल कंपाउंड व दोन मुख्य गेट असल्यानंतरही विभागाच्या परिसरातून ट्रॅक्टर चे साहित्य चोरून नेणारे ते चोर कोण असा सवाल उपस्थित होत असताना अशा साहित्याची चोरी होत आहे.असे असताना महसूल विभागाने पोलिसात तक्रार दिली ना ट्रॅक्टर मालकांनी तेव्हा  मालकांनी या साहित्याचा नेमका चोर कोण याचा काही पत्ता लागला नाही परंतु महसूल विभागातून ट्रॅक्टरची चोरी होतेच कशी असा प्रश्न या ट्रॅक्टर मालकांनी केला आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!