बंद रस्त्यांच्या कामामुळे नागरिक त्रस्त

अनेक दिवसांपासून बंद असलेल्या रस्त्याच्या कामामुळे,डोमा,नवतडा,लोहारा वाशीय नागरिक त्रस्त..


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
मागील वर्षी मोटेगाव ते किटाळी हा रस्ता बनविण्याचे काम मंजूर झाले आणि कामाला सुरुवात झाली बोथली पर्यंत काम पूर्ण झाले या गावाजवळील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली परंन्तु सात महिन्यापासून या रस्त्याचे काम बंद आहे एका बाजूला रस्ता खोदुन ठेवल्यामुळे वाहनांना व नागरिकांना जाण्या येण्यासाठी खूप मोटा त्रास सहन करावा लागत आहे तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते समोरून एकादी वाहन आले तर जाणाऱ्या वाहनाला मोठी अडचण निर्माण होते तसेच रात्रीच्या वेळेस वाहन चालवताना सावधगिरी बाळगून वाहन चालवावे लागते अनेक ठिकाणी रस्ता खोदल्यामुळे खराब झाला असून अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे लोहारा व नवतला वाशीय जनता या रस्त्याच्या बंद कामामुळे त्रस्त आहे तेव्हा लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी अशी जनतेची मागणी जोर धरत आहे..
 मोटेगाव ते शंकरपूर निघणारा हा महत्वपूर्ण मार्ग असून हा मार्ग रस्ता बनविण्यासाठी एका बाजूने कित्येक महिन्यापासून खोदून ठेवले असून कासवगतीने काम सुरु होते व मागील सात महिन्यापासून हे काम बंद अवस्थेत पडले असून कंत्राटदार काम बंद करून गायब झाले आहेत कामावर कुणीही नसून या खोदलेल्या रस्त्यामुळे नागिकांना, वाहनधारकांना, शेतकऱ्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे रस्ता खोदल्यामुळे समोरा समोर मोठे वाहन आले तर रस्ता ओलांडायला खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सुद्धा या खोदल्या रस्त्यामुळे त्रास होत आहे वाहनांच्या वाहतुकीमूळे रस्त्याच्या बाजूच्या चिखल,धूळ उडत असुन दुचाकी वाहनचालकांना त्याचा सुद्धा त्रास होत आहे त्यामुळे संबंधित विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन डोमा,नवतडा, वाशीय जनतेला लवकरात लवकर रस्ता च्या कामाला सुरुवात करून रस्ता बनवून द्यावे आणि होणाऱ्या त्रासापासुन मुक्त करावे अशी मागणी या गावातील नागरिक करीत आहेत....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!