महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा द्वारे,"चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांचा,कोविड - १९ अंतर्गत गौरव



उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ,तहसीलदार संजय नागटिळक,वनपरिक्षेत्राधिकारी अॅड.भावीक चिवंडे,पोलीस निरीक्षक मनोज गभने,डॉ.जयेश मेश्राम यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले


तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
      
चिमूर : - दिनांक.१८/०६/२०२० महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष वसंत मुंडे,विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज चिमूर तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे शाल,श्रिफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले आणि गौरव प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
          महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष वसंत मुडे व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानशे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात,कोविड १९ अंतर्गत विपरीत परिस्थितीत जनहितार्थ उच्चीत असे कार्य करणाऱ्या शासकीय,निमशासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा व प्रतिष्ठित मान्यवरांचा गौरव करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
     याच उपक्रमाचा एक भाग म्हणून चिमूर तालुक्यातील कर्तव्यदक्ष व संवेदनशील अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार शाखा चिमूरच्या वतीने सत्कारातंर्गत गौवर करण्यात आले.
      आज सत्कार करण्यात आलेल्या जागरूक व सतर्क अधिकाऱ्यांत,उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ,चिमूर तहसीलचे तहसीलदार संजय नागटिळक,चिमूरचे वनपरिक्षेत्राधिकारी अॅड.भावीक चिवंडे,पोलीस निरीक्षक मनोज गभने भिसी पोलीस स्टेशन , जांभुळघाट आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ.जयेश मेश्राम यांचा समावेश आहे.
        सदर अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातंर्गत सदैव तत्पर राहून जनतेची योग्य सेवा करीत जनतेला सुरक्षित ठेवण्याचे अमुल्य कार्य केले आहे.त्यांच्या अतिशय महत्त्वाच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने घेतली व आज त्यांचा सोप्या पध्दतीने सन्मानपूर्वक शाल,पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व गौरव प्रमाणपत्र देवून आदरपूर्वक गौरव केला.
        सदर अधिकाऱ्यांचा गौरव करताना,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके,चिमूर तालुका अध्यक्ष केवलसींग जुनी,सरचिटणीस डॉ.कृष्णकुमार टोंगे,उपाध्यक्ष आनंद भीमटे ,पाध्यक्ष दामोधर रामटेके,संघटक विलास मोहिणकर,सहसंघटक उपक्षम रामटेके,सदस्य योगेश अगळे,दखल न्युजचे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी सुनील हिंगणकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!