चिमूर तालुक्यातील कोटगाव ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे गौरवपत्र देवून सत्कार
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.१८/०६/२०२० चिमूर तालुकाअंतर्गत मौजा कोटगाव ग्रामपंचायत आहे.सदर कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत कोवीड १९ ला अनुसरून समन्वयाद्वारे नियोजनबद्ध पद्धतीने उत्तंम कार्य करण्यात आले असून,या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने घेतली व कोटगाव ग्रामपंचायतचे सरपंच चरणदास वाघ व सचिव राकेश गजभे याचां कोरोणा लढवैय्या योध्दा,या अनुषंगाने आज महाराष्ट्रात राज्य मराठी पत्रकार संघ शाखा चिमुर द्वारा शाल-श्रिफळ,गुच्छ स्वागत करण्यात आला आणि प्रमाणपत्र देवून त्यांना गौरविण्यात आले.
याचबरोबर उपसरपंच निर्मलाताई सहारे,ग्रामपंचायत सदस्य सुरेश मुंडरे,प्रकाश मोहुर्ले,सदस्या प्रितीताई अरुण उईके,यांचे फुले देवून म.रा.म.प. संघातर्फे स्वागत करण्यात आले.
कोटगाव ग्रामपंचायत सरपंच चरणदास वाघ,सचिव राकेश गजभे,व ग्रामपंचायत पदाधिकारी,यांनी कोरोणातंर्गत संचारबंदी काळात गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा कोटगाव,दाबकाहेटी,वगरपेठ, येथील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी वेळीच निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी केली,तद्वतच साबून व माॅस्क देवून तिन्ही गावच्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे उचीत कार्य केले.
परत क्वारंटाईन संबंधाने दक्ष राहातं,त्यांनी सतर्कपणे कर्तव्य पार पाडले.सरपंच,सचिव,गटग्रामपंचायत पदाधिकारी हे नागरिकांच्या उन्नत कार्याप्रती व शासकीय योजना अंतर्गत माहिती देण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
त्यांच्या जागरूक कार्याची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ चिमूर शाखाने,"दखल,घेत,आज कोटगाव ग्रामपंचायत सभागृहामध्ये स्वागतातंर्गत प्रमाणपत्र देवून सरपंच व सचिव यांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
सरपंच व सचिव यांचा गौरव करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके,चिमूर तालुका अध्यक्ष केवलसींग जुनी,तालुका सरचिटणीस डॉ.कृष्णकुमार टोंगे,उपाध्यक्ष दामोधर रामटेके,संघटक विलास मोहिनकर,सहसंघटक उपक्षम रामटेके,दखल न्युज चे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी सुनील हिंगणकर,योगेश अगडे,हे प्रामुख्याने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!